Vidhansabha 2019 : शेकाप कोल्हापूर जिल्ह्यात या पाच जागा लढणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

  • विधानसभेच्या पाच जागा लढविण्याचा शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात निर्णय. 
  • टेंबे रोडवरील पक्ष कार्यालयात मेळावा
  • कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा-शाहूवाडी, राधानगरी-भुदरगड या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय. 

कोल्हापूर - विधानसभेच्या पाच जागा लढविण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात आज घेण्यात आला. टेंबे रोडवरील पक्ष कार्यालयात हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, पन्हाळा-शाहूवाडी, राधानगरी-भुदरगड या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाला.

श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी कठीण प्रसंग आले त्यावेळी शेकाप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन समाजात स्थैर्य तसेच शांततेसाठी एकदिलाने प्रयत्न केले. त्यामुळेच ग्रामीण भागात पक्षाचे आस्तित्व टिकून राहिले आहे. त्याची उतराई म्हणून जिल्ह्यातील पाचही विघानसभा ताकदीने लढविणार आहोत. कॉंग्रेस आघाडीने शेकाप दुर्बल आहे असे समजू नये, जिल्ह्यातील जनता शेकापच्या मागे खंबीरपणे उभी राहिल.

प्रा. पी. एस. पाटील, बाबुराव कदम, शिवाजी साळुंखे, भारत पाटील, भिमराव देसाई, बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, संभाजी जगदाळे, एकनाथ पाटील, अजित सुर्यवंशी यांची भाषणे झाली. वसंत कांबळे, महादेव नाईक, चंद्रकांत बागडे, निवास लाड, अशोकराव पवार-पाटील, आनंदा मोरे, कुमार जाधव, इंदूबाई पाटील, राजश्री सावंत. दमयंती कडोळकर आदी उपस्थित होते. वैशाली सुर्यवंशी यांनी आभार मानले. शेकापच्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार संपतराव पवार-पाटील, बाबुराव कदम, भारत पाटील आदि 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Shekap will contest these five seats in Kolhapur district