Bharat-Bhalke
Bharat-Bhalke

#Vidhan Sabha 2019 : मोडकळलेल्या राष्ट्रवादीला भारत भालके सावरणार काय ?

विधानसभा 2019 : मंगळवेढा - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या बुरुजाला धक्कादायक तडा देणारे आ. भालके यांनी राष्ट्रवादीतच प्रवेश केल्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन येणार असल्याचा सूर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातून त्यांच्या पक्षप्रवेशानंतर व्यक्त केला.

आता निवडणूक ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यात होणार हे स्पष्ट झाले. गेल्या आठवडाभरापासून भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या आ. भालके हे काॅग्रेसमध्ये एकाकी पडले. परवा पर्यत भाजप प्रवेशाच्या यादीत होते, कालच्या भाजप प्रवेशामध्ये फक्त दोघांनाच प्रवेश झाला. सुधाकर परिचारक हे भाजपाचे उमेदवार असल्याचे सर्वात आधी सरकारनामानी प्रसिद्ध केले होते. मतदारसंघात या वृत्ताने चांगलीच खळबळ उडाली असल्यामुळे काॅग्रेसवर नाराज असलेले आ. भालके काय करणार याची उत्सुकता लागली. आ. भालके यांना आमदार करण्यात काॅग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मदत होत होती.

लोकसभा निवडणुकीपुर्वी सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी का जावू अशी भूमिका मांडली होती. सुशीलकुमार शिंदे व शरद पवार वडीलासमान असताना त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीने खळबळ उडाली. दरम्यान, आता भालके राष्ट्रवादीच्या गळाला लागल्यामुळे मरगळलेल्या राष्ट्रवादीला एक चांगला आधार मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती असल्यामुळे कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या काळामध्ये प्रभावी वक्ते प्रचाराला येणार नसल्यामुळे एकट्या आ. भालके यांनाच विधानसभेची खिंड लढवावी लागणार होती, याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत दिसून आली. केवळ आ. भालके यानी सरकारने दुर्लक्ष केल्याने विकासावर झालेला परिणामावर प्रहार केल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना सात हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

पण, उलटपक्षी राष्ट्रवादीकडे शरद पवार, खा. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, खा.सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, रूपाली चाकणकर असे प्रभावी वक्ते असल्याने प्रचार यंत्रणा हाताळने अतिशय सोपे जाणार असल्यामुळे ते राष्ट्रवादीच्या गळाला लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com