कडेगावात जोरदार हाणामारी, दोघे जखमी

कडेगावात जोरदार हाणामारी, दोघे जखमी

कडेगाव - येथील इनामदार वाड्यातील दोन कुटुंबांत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती वादाचे पर्यवसान जोरदार फिल्मी स्टाईल मारामारीत झाले. यात इम्तियाज ऊर्फ बाळूभई मुबारक शेख (वय ३४, रा. कडेगाव) व शाबाज ऊर्फ छोटू इस्माईल पठाण (रा. कऱ्हाड, जि. सातारा) हे दोघे गंभीर जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, की येथे इम्तियाज ऊर्फ बाळू भई शेख व येथील अन्य एका कुटुंबात किरकोळ कारणावरून दोन ते तीन दिवसांपासून वाद सुरू होता; तर काल दुपारी बाराच्या सुमारास यांच्यात पुन्हा वाद उफाळला. त्याचे पर्यावसान जोरदार मारामारीत झाले. यात शाबाज ऊर्फ छोटू पठाण याने लोखंडी रॉडने इम्तियाज ऊर्फ बाळू भई याच्या डोक्‍यात, हातावर तसेच पाठीवर जोरदार हल्ला केला. त्यात इम्तियाज हा गंभीर जखमी झाला; तर इम्तियाजला मारहाण झाल्याची माहिती त्याच्या कराड येथील सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी कडेगाव येथे येऊन शाबाज ऊर्फ छोटू पठाण यास दांडक्‍याने व लाथाबुक्‍यांनी जोरदार मारहाण करून गंभीर जखमी केले.

दरम्यान, या मारामारीची माहिती कडेगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी इम्तियाज शेख व शाबाज ऊर्फ छोटू पठाण या दोघांना कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

मारामारीच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; तर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर यांनी मारामारीच्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या. शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी व चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवल्याने तणावाचे वातावरण नियंत्रणाखाली होते. संबंधित मारामारीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत कडेगाव पोलिस ठाण्यात सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com