विजय औटींविरुध्द सोशल मिडियावर पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

पारनेर : रुई छत्रपती येथील युवक संदिप साबळे यांनी आमदार विजय औटी यांना संबोधून फेसबुकवर 'रुई छत्रपती येथील छावण्यांवर घोटाऴे चालु आहेत' हे दिसत नाही का? अशी पोस्ट टाकली आहे.

पारनेर : रुई छत्रपती येथील युवक संदिप साबळे यांनी आमदार विजय औटी यांना संबोधून फेसबुकवर 'रुई छत्रपती येथील छावण्यांवर घोटाऴे चालु आहेत' हे दिसत नाही का? अशी पोस्ट टाकली आहे. औटी यांनी शनिवारी (ता.11) रात्री १० वाजता सुपा पोलिस स्टेशनला संदिप साबऴे विरुध्द फिर्याद दिली आहे. त्यावरून साबळे यांच्या विरोधात सुपे पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या बाबत माहिती अशी की, रुई छञपती येथे दोन चारा छावण्या आहेत. त्यामुळे या छावण्यांवर मोठा घोटाऴा चालत असल्याने 'नगरचा कलेक्टर, पारनेरचा तहसीलदार, पारनेरचा नामदार झोपलेत का? हे त्यांना दिसत नाही रुई छत्रपती छावणीत काय घोटाऴा चाललाय? 'अश्या प्रकारची सोशल मिडीयावर पोस्ट टाकली.

ही पोस्ट औटी यांच्या वैयक्तीक अकांउटवर आल्याने तात्काळ त्यांनी साबळे याच्या विरुध्द फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कुमार सोने करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay auti filed a case against one for abusive post on social media