विजय बुरकूल यांची बसवेश्वर स्मारक समितीचे सदस्यपदी निवड

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - येथील बहुचर्चित बसवेश्वर स्मारक समितीच्या सदस्य संख्येत वाढ झाली असून, विजय बुरकूल यांचा यात समावेश केला आहे. याबाबत शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने आज शासननिर्णय जारी केला.

मंगळवेढा - येथील बहुचर्चित बसवेश्वर स्मारक समितीच्या सदस्य संख्येत वाढ झाली असून, विजय बुरकूल यांचा यात समावेश केला आहे. याबाबत शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने आज शासननिर्णय जारी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यात स्मारकाच्या मागणीचा जोर धरल्यावर 20 मार्च रोजी शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षस्थेतेखाली 24 सदस्यांचा समावेश करत समितीची निवडीचा निर्णय जाहीर केला. या समितीमध्ये आ.भारत भालके, आ.दिलीप सोपल, आ प्रशांत परिचारक, आ हरिष पिंपळे, माजी आमदार मनोहर पटवारी, काकासाहेब कोयटे, गुरुनाथ बडूरे, ऍड शैलेश हावनाळे, उदय चौंडे, गंगाधर पटणे, नगराध्यक्ष अरुणा माळी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता जि.प., तहसीलदार, सवर्धक सहायक भारतीय पुरातत्व सर्वेक्षक विभाग, जिल्हास्थरीय पुराभिलेख अधिकारी, वास्तुशास्त्र सार्वजनिक बांधकाम विभाग, कला संचालक मुंबई, सहायक संचालक नगररचना विभाग, व स्मारकाशी संबधित संस्थेचे अध्यक्ष यांचा समावेश केला. आता विजय बुरकूलच्या रूपाने सदस्य संख्येत वाढ झाली त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Vijay Burkul elected as the member of the Basaveshwar Memorial committee