सुप्रिया सुळे यांना येत्या लोकसभेत लायकी दाखवणार - विजय शिवतारे

shivtare
shivtare

वाल्हे - ''पुरंदरमध्ये जगतापाचं डोकं फिरलय, त्यामुळे तो कुठेही रस्त्यावर बसून आंदोलन करत असतो. २०१९ मध्ये त्याला आता रस्त्यावरच आणणार असल्याची कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यावर टीका केली. यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी गेल्या पंचवीस वर्षात पुरंदर तालुक्याची अक्षरशः वाट लावली. तसेच कामांपेक्षा सेल्फीमध्ये गुंगणाऱ्या सुप्रिया सुळे यांना येत्या निवडणुकीत त्यांची लायकी दाखवून देऊ, अशा शिवराळ भाषेत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची खासदार 
सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

राख(ता.पुरंदर) येथे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातुन विविध विकासकामांचे भुमिपुजन व उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते 
बोलत होते. याप्रसंगी दिलीप यादव, शालिनी पवार, मंदार गिरमे, शिवाजी पवार, गजानन रणनवरे, वसंत रणनवरे, राहुल रणनवरे, बाळासो रणवरे, जयवंत माने, सुदाम रणनवरे, निलेश पवार, नाना पवार, सोमनाथ सुर्वे आदि उपस्थित होते. 

येत्या अडीच वर्षात येथील शेतामध्ये गुंजवणीचे पाणी खेळणार आहे. हे काम पुढील शंभर ते दोनशे वर्षे टिकणार आहे. तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ 
येत आहे, त्यामुळे तालुक्यातील लाखो युवकांना रोजगार मिळणार आहे. मात्र तो जगताप डोकं फिरल्याप्रमाणे रस्त्यावर बसून विमानतळाविरोधात आंदोलन करत असतो, त्याला आता रस्त्यावरच आणणार असल्याची टीका करताना नावाला जिवंत असलेल्यांची फडफड आपण थांबवणार असल्याचेही शिवतारे यावेळी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोध्याप्रश्नी केलेल्या वक्तव्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी पुरंदरसाठी काय केले? पंचवीस वर्षात त्यांनी पुरंदरचे फक्त वाटोळे केले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांवर बोलण्याची अजित पवार व सुप्रिया सुळे यांची लायकी आहे का? असे बोलतानाच साहेबांमुळे तुम्हाला किंमत साहेबांचे नाव वजा केल्यास तुम्हाला घरात नाही तर गोठ्यात जावे लागेल अशी खरमरीत टीकाही केली. पुणे जिल्ह्यात २१ मतदार संघांमधून नामशेष झालेले जिल्हा बँक व जिल्हा परिषदेच्या जीवावर तग धरून असून असून येत्या २०१९ च्या लोकसभेला सुप्रिया सुळे यांना त्यांची लायकी दाखवून देणार असल्याचा इशाराही शिवतारे यांनी यावेळी दिला. 

सरपंच उमाली रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. अतुल म्हस्के यांनी सुत्रसंचालन तर गजानन रणनवरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com