एकदिलाने कामातून जिल्हा घडवू अग्रेसर - विजय शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सातारा - सातारा जिल्ह्यात कमी निधीत जास्त सिंचनाचे काम झाले आहे. विकासप्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करून सातारा जिल्हा राज्यातील अग्रेसर जिल्हा घडवावा, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

सातारा - सातारा जिल्ह्यात कमी निधीत जास्त सिंचनाचे काम झाले आहे. विकासप्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करून सातारा जिल्हा राज्यातील अग्रेसर जिल्हा घडवावा, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्री. शिवतारे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्या वेळी ते बोलत होते. युवा माहिती दूत या उपक्रमाचा प्रारंभ, महाबळेश्‍वरच्या ट्रेकर्सचा सत्कार आदी कार्यक्रम झाले. ते म्हणाले, ‘‘जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राने प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत ४१ खासगी मान्यताप्राप्त सूचिबद्ध प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून चार हजार ३६२ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यातील दोन हजार ४८० उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला असून, ८२ उमेदवारांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबविले असून, चार वर्षांत एकूण ७२६ गावांची निवड करण्यात आली. या अभियानांतील कामांमुळे टॅंकरच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ओढा जोड प्रकल्प, पाझर तलाव जोड प्रकल्प, नदी पुनरुज्जीवन आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.’’ 

श्री. शिवतारे म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत मार्चअखेर ५७३.६८ लाख रुपयांचे वाटप, तर प्रधानमंत्री जनधन योजनेत जिल्ह्यात एकूण सहा लाख ४१ हजार ३०८ बॅंक खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत एक लाख २९ हजार ८७, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना दोन लाख ८३ हजार ७९० बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एकूण ६२ हजार ३५६ गॅस जोडण्या दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज शेतकारी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ९३ हजार ७८२ शेतकऱ्यांकडे ४३५ कोटींची रक्कम जमा केली आहे. शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांच्या सहभागातून २९ लाख ७३ हजार रोपे लागवड करण्यात आली आहेत.’’ 

कार्यक्रमास आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्ष माधवी कदम, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

केंद्र पुरस्कृत योजनांतील लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा करण्यासाठी केंद्र शासनाकडून पीएफएमएस हे सॉफ्टवेअर तयार आहे. आगामी काळात लाभार्थ्यांना याच प्रणालीतून पेन्शन वाटप होईल.
- विजय शिवतारे, पालकमंत्री, सातारा

Web Title: Vijay Shivtare talking on irrigation work development