Loksabha 2019 : मी कुठे गेलो आहे भाजपमध्ये : विजयसिंह मोहिते-पाटील

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मी कुठे गेलो आहे भारतीय जनता पक्षात, असा प्रतिप्रश्न करून पत्रकारांना निरुत्तर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या कुचंबणेला कंटाळून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या भाजपा प्रवेशाला विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे तथापि विजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही. या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. 

दर्शन घेतल्या नंतर पत्रकारांनी त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच श्री विठ्ठलाच्या दर्शनास आला आहात ना असा प्रश्न केला असता श्री.मोहिते-पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता मी कुठे गेलो आहे भारतीय जनता पक्षात असा प्रतिप्रश्न करून पत्रकारांनाच निरुत्तर केले.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक वर्षे काम केले. पक्षातील अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या परंतु तरीदेखील पक्षांमध्ये त्यांची कुचंबणा होत होती. त्याला कंटाळून नुकताच त्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. रणजीत सिंहांच्या भाजपा प्रवेशामुळे प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. विजयसिंह मोहिते पाटलांनी मात्र  भारतीय जनता पक्षात अजून प्रवेश केलेला नाही.

दरम्यान श्री विठ्ठल दर्शनानंतर श्री मोहिते-पाटील यांनी भागवताचार्य वा. ना.उत्पात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

तुमच्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या भागातून तुम्हाला मताधिक्य मिळाले होते. आता तर तुम्ही  भारतीय जनता पक्षात आला आहात. त्यामुळे यापुढे आमची तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मदत होईल असे श्री उत्पात म्हणाले, तेव्हा श्री विजय सिंह यांनी त्यांना हसून दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com