भाजपच्या विक्रम पाटलांसह सहा जणांना शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

इस्लामपूर : भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचा राग मनात धरुन दोघांना मारहाण केल्याप्रकरणी इस्लामपूर नगरपालिकेचे पक्षप्रमुख व भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम अशोक पाटील यांच्यासह एकूण सहा जणांना सहा महिने साधा कारावास व जखमीना प्रत्येकी तीन हजार नुकसान भरपाई देण्याची शिक्षा न्यायाधीश एस. व्ही. मेटील-पाटील यांनी सुनावली. महेश अशोक पाटील, अजित दिलीप जाधव, महादेव भगवान होगाडे, गजानन महादेव पाटील, इम्रान अल्लाबक्ष शेख अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या सहाजणांनी येथील माळगल्ली परिसरात राहणाऱ्या गंगाराम शिवाजी शिंगाडे व नितीन प्रकाश लाखे या दोघांना भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचा राग मनात धरुन 15 ऑगस्ट 2006 रोजी जय हनुमान पंतसंस्था परिसरातील आशा डिजीटल लॅब समोर लोखंडी गज व हॉकी स्टीकने मारहाण केली होती. यात नितीन लाखे यांचा हात फ्रॅक्‍चर झाला होता. याबाबतची फिर्याद गंगाराम शिंगाडे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी विक्रम पाटील यांच्यासह सहा जणांच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद करत येथील दोषारोपपत्र दाखल केले. याची सुनावणी आज होऊन न्यायालयाने त्यांना सहा महिने साधी कैद व जखमीना प्रत्येकी तीन हजार नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली. या घटनेने इस्लामपूर शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Web Title: Vikas Patil with six person to jail