विकास सोसायट्या सक्षमीकरणाची मोहीम ढेपाळली
सोलापूर : राज्यात 21 हजार 70 विकास सोसायट्या आहेत. त्यापैकी शासनाच्या अटल महापणन अभियानांतर्गत निवडलेल्या 3 हजार 622 पैकी 915 विकास सोसायट्यांनीच स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर विभागच पिछाडीवर आहे.
सोलापूर : राज्यात 21 हजार 70 विकास सोसायट्या आहेत. त्यापैकी शासनाच्या अटल महापणन अभियानांतर्गत निवडलेल्या 3 हजार 622 पैकी 915 विकास सोसायट्यांनीच स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर विभागच पिछाडीवर आहे.
खासगी सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याकरिता राज्य पातळीवरील राज्य बॅंक आणि जिल्हा पातळीवरील जिल्हा बॅंक तर गावपातळीवरील विकास सोसायट्या सक्षम करण्यात येत आहेत. त्यासाठी अटल महापणन अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गंत गावपातळीवर जिल्हा बॅंकेंतर्गत काम करणाऱ्या विकास सोसायट्या सक्षम करण्यात येत आहेत. परंतु, राज्यातील सुमारे 10 जिल्हा बॅंका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. या अभियानानुसार प्रत्येक सोसायट्यांना स्वत:च्या भांडवलातूनच व्यवसाय सुरू करावे लागत असल्याने बहुतांशी सोसायट्यांकडून पाठ फिरविली जात असल्याचे चित्र आहे.
अटल महापणन अभियानांतर्गत व्यवसाय सुरू करण्याकरिता पणन विभागाकडून सहकर्याची अपेक्षा बहुतांशी सोसायट्यांनी केली आहे. योजना जरी प्रभावी असली तरी त्यासाठी भांडवल आवश्यक असून त्यासाठी शासनाने अर्थसहाय करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
विभागनिहाय व्यावसायिक सोसायट्या
नाशिक
582 पैकी 285
पुणे
390 पैकी 59
कोल्हापूर
477 पैकी 205
औरंगाबाद
312 पैकी 30
लातूर
440 पैकी 51
अमरावती
616 पैकी 110
नागपूर
464 पैकी 50
-
आकडे बोलतात...
एकूण सोसायट्या
21,070
पहिल्या टप्प्यातील सोसायट्या
3,622
व्यवसायिक सोसायट्या
915
रोजगार निर्मिती
9108
व्यवसायातून मिळालेला नफा
2,76,45,510
गुंतवलेली एकूण रक्कम
20,20,11,736