भाजप नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेचीच धुंदी : विखे-पाटील

Vikhe Patil Criticizes BJP leaders
Vikhe Patil Criticizes BJP leaders

नगर तालुका : "राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असलेल्या भाजपच्या सर्वच नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेची धुंदी चढलेली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी-कार्यकर्ते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. त्यातही चंद्रकांत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही आमदार राम कदम यांची पाठराखण करतो, हे प्रचंड दुर्दैवी आहे. किमान पाटील यांच्यासारख्या नेत्याकडून अशी अपेक्षा नव्हती,'' अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शुक्रवार) येथे केली. 

नगरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार सुधीर तांबे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, नंदकुमार झावरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, ""इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यातून देशात सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे. दोन कोटींपेक्षा अधिक तरुण नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. रोजगारच उपलब्ध होत नसल्याने युवा पिढी भरकटत चालली आहे. नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त केली. काळा पैसा बाहेर आणण्याची केलेली घोषणाही फसवीच निघाली. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजप सरकारचा अजिबात आधार वाटत नाही.'' 

लष्करी जवानांच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत परिचारक, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्यांकडून झालेल्या वक्तव्यांचाही विखे पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. 

"भारत बंद' 

कॉंग्रेस आघाडीतर्फे इंधन दरवाढीच्या व वाढत्या महागाईच्या विरोधात सोमवारी (ता. 10) "भारत बंद'चे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये सरकारविरोधी सर्वच पक्षसंघटना सहभागी होतील, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com