विखे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध, नव्या दहा चेहऱ्यांना संधी 

विखे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध, नव्या दहा चेहऱ्यांना संधी 

शिर्डी ः पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज बिनविरोध झाली. एकवीस संचालकांच्या या मंडळात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश असून, त्यात दहा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 


अर्जमाघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत उर्वरित तेरा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी काम पाहिले. तहसीलदार कुंदन हिरे यांनी त्यांना सहकार्य केले. नूतन संचालक मंडळाने प्रवरानगर येथे कारखान्याचे संस्थापक विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. 


या निवडणुकीत केवळ विखे समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विरोधी गटाकडून अर्ज दाखल झाले नव्हते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार होती. कारखान्याचे मार्गदर्शक आमदार विखे पाटील यांनी काल नूतन संचालक मंडळाची यादी निश्‍चित केली. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आज अर्ज मागे घेण्यात आले. निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी जाहीर केले.

 
नव्या संचालक मंडळात दहा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. कर्जमाफी होईल, या आशेने बहुतांश सभासद कर्ज थकवून व्याजाचा भुर्दंड सहन करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बिगर थकबाकीदार उमेदवार मिळणे दिव्य होऊन बसले. काही उमेदवारांवर संचालक होण्यासाठी कर्ज भरण्याची वेळ आली. 

नवे संचालक 
कैलास सूर्यभान तांबे (चिंचपूर), डॉ. दिनकर गणपत गायकवाड (आश्‍वी खुर्द), ऍड. भानुदास लहानू तांबे (दाढ बुद्रुक), देवीचंद भारत तांबे (दाढ बुद्रुक), विश्‍वास केशव कडू (सात्रळ), उत्तम रामभाऊ दिघे (धानोरे), आमदार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (लोणी बुद्रुक), दादासाहेब चंद्रभान घोगरे (लोणी खुर्द), संजय सोपान आहेर (लोणी खुर्द), धनंजय बाबासाहेब दळे (भगवतीपूर), स्वप्नील सुरेश निबे (कोल्हार बुद्रुक), दत्तात्रय साहेबराव खर्डे (कोल्हार बुद्रुक), साहेबराव जिजाबा म्हस्के (बाभळेश्‍वर), सतीश शिवाजीराव ससाणे (ममदापूर), संपत भाऊसाहेब चितळकर (मांडवे), उज्ज्वला अशोक घोलप (हणमंतगाव), संगीता भास्कर खर्डे (भगवतीपूर), शांताराम गेणूजी जोरी (दाढ खुर्द), बाबू फकिरा पलघडमल (सात्रळ), सुभाष नामदेव अंत्रे (सोनगाव), रामभाऊ शंकरराव भुसाळ (उंबरी).  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com