गरजूंच्या मदतीसाठी गावगाड्यातल्या पोरांचं नाटक

‘अंगार, अर्थात डोंगरचा राजा’ नाटकातील एक प्रसंग.
‘अंगार, अर्थात डोंगरचा राजा’ नाटकातील एक प्रसंग.

कोल्हापूर - सतरा वर्षीय प्रसाद मिरजकर या अप्लास्टिक ॲनेमियाग्रस्त मुलाच्या मदतीसाठी शनिवारी (ता. २४) भुयेवाडीच्या जय भवानी नाट्य मंडळाच्या ‘अंगार अर्थात डोंगरचा राजा’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. प्रतिज्ञा नाट्यरंग उपक्रमांतर्गत हा प्रयोग होणार असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या ऐच्छिक प्रवेशिका शुल्काच्या रकमेतून प्रसादला मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत गावगाड्यातल्या पोरांचा हा प्रयोग विशेष उल्लेखनीय ठरला. आता त्याचे प्रयोग गरजू व्यक्ती व संस्थांसाठी होणार असल्याची माहिती नाटकाचे दिग्दर्शक पांडुरंग पाटील, प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राजर्षी शाहू स्मारक भवनात दुपारी चार वाजता प्रयोग होईल. 

यंदाच्या राज्य स्पर्धेत दचकतच प्रवेशिका भरणाऱ्या या संस्थेने नाटकाचे दमदार सादरीकरण केले. चंद्रकांत शेट्ये लिखित हे नाटक ऐंशी ते नव्वदच्या दशकातलं असलं तरी आजही ते चपखलपणे लागू पडतं. मूळ तीन अंकी नाटक दोन अंकात सादर करताना दिग्दर्शकाने संहितेला कुठेही तडा जाऊ न देता घेतलेली खबरदारी, नेपथ्य आणि प्रकाश योजनेतील काही गोष्टीही नक्कीच दखल घेण्यासारख्या आहेत. नाटकातलं प्रचलित कुठलंही शिक्षण नाही किंवा अगदी एखादं शिबिरही यातल्या कुणी कधी केलेलं नाही.

आपापली शेती, सेंट्रिंग-फरशी व्यवसाय, एमआयडीसीतील नोकरी सांभाळून संस्थेतील कलाकारांनी नाटकाचं हे वेड जपलं आहे. सिनेस्टार दादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे कलाकार घडले असून दादा भोसले यांची प्रयोगाला विशेष उपस्थिती असेल. पत्रकार परिषदेला विजय साठे, प्रसन्न इंगळे, रोहित पाटील, वसंत शिंदे, आनंद ढेरे, बी. जे. पाटील, निर्माते महादेव चौगले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com