प्रत्येक ग्रामसभेला संपर्क अधिकारी

ZP-Satara
ZP-Satara

सातारा - गावच्या विकासामध्ये ग्रामसभांना अत्यंत महत्त्व आहे. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये नियमित विषयांसह जिल्हा परिषदेने ठरविलेल्या १३ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्याची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात येणार असून, १८ खातेप्रमुखही ग्रामसभांना उपस्थित राहणार आहेत. 

प्रजासत्ताकदिनाच्या ग्रामसभेत शासकीय जागेवरील निवासी प्रयोजनार्थ करण्यात आलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे, ग्रामपंचायत विकास आराखड्यातील कामांच्या आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेणे, पंतप्रधान आवास योजनेतील निकषानुसार अपात्र असणारे लाभार्थी वगळणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ उपक्रमावर चर्चा करणे आदी १३ विषय जिल्हा परिषदेने ग्रामसभांना चर्चेसाठी ठरवून दिले आहेत. 

अधिकाऱ्यांची नावे आणि ग्रामपंचायतीचे नाव असे - अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे-क्षेत्रमाहुली (ता. सातारा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सत्यजित बडे-बावडा (ता. खंडाळा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अविनाश फडतरे - त्रिपुटी (ता. कोरेगाव), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किरण सायमोते - घोणशी (ता. कऱ्हाड), मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी. आर. काळोखे -कटगुण (ता. खटाव), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार- सुरूर (ता. वाई), बांधकामचे कार्यकारी अभियंता (उत्तर) संजय पाटील- भोंदवडे (ता. सातारा), कार्यकारी अभियंता (दक्षिण) संतोष रोकडे- मेटगुताड (ता. महाबळेश्‍वर), ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल शिंदे-आदर्की बुद्रुक (ता. फलटण), जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल नाईक-पिंगळी बुद्रुक (ता. माण), जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षचंद्र डोंगरे-चाफळ (ता. पाटण), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार-तारळे (ता. पाटण), कृषी विकास अधिकारी विनायक पवार-कोळकी (ता. फलटण), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) एम. एम. ससे-पेरले (ता. कऱ्हाड), प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर-कुडाळ (ता. जावळी), माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर-अहिरे (ता. खंडाळा), निरंतर शिक्षणाधिकारी ए. जी. मगदूम-भिवडी (ता. कोरेगाव), वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. टोपणे-गोंदवले बुद्रुक (ता. माण).

आढावा सादर करावा लागणार
या अधिकाऱ्यांनी ग्रामसभांना हजर राहिल्यानंतर त्याबाबतचा आढावा २८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे हे साप्ताहिक बैठकीत घेणार आहेत. तसेच वर्ग एकच्या अधिकाऱ्यांप्रमाणे वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांनाही संबंधित गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विविध ग्रामसभांना हजर राहावे लागणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांना प्रत्येक ग्रामसभेसाठी एक संपर्क अधिकारी नियुक्‍त करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com