`या` गावात मिळणार मोफत "आरओ'चे पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

थकबाकी वसूल होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांवर परिणाम झाला आहे. कर वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीने मोफत आरओ प्लान्टचे पाणी देण्याची योजना सुरू केली आहे. 

पंढरपूर : ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टीसह इतर करांचा 100 टक्के भरणा करणाऱ्या कुटुंबाला ग्रामपंचायतीच्या वतीने वर्षभर दररोज आरओ प्लान्टचे (शुद्ध पाणी) 20 लिटर पाणी मोफत देण्याचा निर्णय उपरी (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीने घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची बैठक नुकतीच झाली, तीमध्ये हा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला ग्रामस्थांतूनन चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे, अशी माहिती सरपंच संगीता नागणे यांनी दिली. 

हे ही वाचा... स्मार्ट सोलापुरकरांनी काय केला ओव्हरस्मार्टपणा 

येथील ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टीसह इतर विविध करांची सुमारे साडेचार लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसूल होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांवर परिणाम झाला आहे. कर वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीने मोफत आरओ प्लान्टचे पाणी देण्याची योजना सुरू केली आहे. 

हे ही वाचा... छानच की, सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रथमच नवे पदवी प्रमाणपत्र

ग्रामपंचायतीच्या या योजनेला ग्रामस्थांतून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या आठ ते 10 दिवसांत गावातील सुमारे 20 मिळकतदारांनी ग्रामपंचायतीच्या करांची थकीत रक्कम भरून मोफत शुद्ध 20 लिटर पाण्याचा लाभ घेतला आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतःचा आरओचा पाणी प्लॉट सुरू केला आहे. प्रती लिटर 20 पैसे अल्पदरात पाणीपुरवठा केला जात आहे. काही दिवसांत पिठाची चक्कीही चालू केली जाणार असल्याचे सरपंच संगीता नागणे यांनी सांगितले. या वेळी ग्रामसेवक श्री. ईलेवाड, माजी उपसरपंच शहाजी मोहिते, शहाजी नागणे, उपसरपंच अण्णासाहेब नागणे, ग्रामपंचायत सदस्य सतीश नागणे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The village will get pure water