कोल्हापूर : संतप्त ग्रामस्थांनी शाळेत बांधली जनावरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

कोल्हापूर -  कुशिरे (ता. पन्हाळा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आज शाळेत जनावरे बांधून अनोखे आंदोलन केले. 

शाळेच्या धोकादायक इमारतीकडे ग्रामस्थांनी वारंवार लक्ष वेधून देखील प्रशासनाकडून याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेच्या आवारात जनावरे बांधून प्रशासनाचा निषेध केला. शाळा बंद करून असे अनोखे आंदोलन केले. जोपर्यंत मोडकळीस आलेली इमारत पाडली जात नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवायचे नाही असा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला आहे.  विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने इमारतीसोबतच स्वच्छतागृहे, स्वयंपाकगृह, शाळेस संरक्षक भिंत या सोयी सुविधाही द्याव्यात असी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers agitation in Kushire