पुकळे दांपत्याकडुन श्रमदान व अल्पोपहार वाटप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

मायणी- पाचवड (ता.खटाव) येथे सुरू असलेल्या जलसंधारण कामांत श्रमदान करणाऱ्या लोकांसाठी पंचायत समिती सदस्या मेघताई पुकळे व श्री जीवनशेठ पुकळे यांनी सामाजिक जाणिवेतुन अल्पोपहाराचे वाटप केले. तसेच पुकळे दांपत्याने लोकांच्या बरोबर श्रमदान करुन खारीचा वाटा उचलला.

पाचवड येथे लोकसहभागातुन जलसंधारणाचे काम सुरू आहे. गावकऱ्यांनी सुरवातीला पाणी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची विविध कामे हाती घेतली. मात्र विविध कारणांमुळे त्या स्पर्धेतुन बाहेर पडल्याने आता नाम फाऊंडेशनचे सहकार्य घेण्यात येत आहे. नाम संस्थेकडुन त्यांना एक पोकलेन देण्यात आला आहे. यांत्रिक कामांबरोबरच गावातील आबालवृद्ध दररोज श्रमदानाचा धडा गिरवत आहेत. दररोज तीन तास झपाटल्यासारखे काम करीत आहेत. त्यांना मायणी, कलेढोण भागातील विविध गावांतुन लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. 

तरुणांची मंडळे, विविध सेवाभावी संस्था तेथे श्रमदानासाठी जात आहेत. चांगले काम झाल्यास गाव पाणीदार होऊन दुष्काळाला सोडचिठ्ठी मिळेल. तसेच, कलेढोण गणात एक चांगले काम सुरू असुन त्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा. या भावनेने पंचायत समिती सदस्या मेघाताई पुकळे व जीवनशेठ पुकळे यांनीही श्रमदानासाठी हजेरी लावली. श्रमदान करुन लोकांना प्रेरणा दिली. सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर श्रमदानासाठी उपस्थित असलेल्या आबालवृद्धांना अल्पोपहार व पाच हजार रुपयांची मदत देऊ केली.  

Web Title: Villages gear up to tackle drought