वाई : गीता पाठांतर स्पर्धेत विनया करमळकर, शर्वरी गुरुड, रजनी पुराणेचे यश

वाई : गीता पाठांतर स्पर्धेत विनया करमळकर, शर्वरी गुरुड, रजनी पुराणेचे यश

वाई ः विवेकानंद केंद्र कन्याकुमारी वाई शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या गीता पाठांतर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत खुल्या गटात विनया करमळकर यांनी तर शर्वरी गुरुड व रजनी पुराणे यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला. 

गीता पाठांतर स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 100 स्पर्धकांनी भाग घेतला. मृणालिनी खरे व सुधा काळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना कन्याशाळेच्या संस्था प्रतिनिधी स्वाती शेंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धा वाई अर्बन बॅंकेने प्रायोजित केल्या. शुभांगी लिमकर, अंजली मांढरे, ज्योती कारळे, स्वाती खारोटे, नंदा रासकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

स्पर्धेतील गटनिहाय विजेत्यांची नावे याप्रमाणे ः गट क्रमांक 1 (पहिली- दुसरी)- पार्थ अमय पाटील (प्रथम), रुद्र प्रवीण शिंदे, तृतीय- सोहम ज्ञानेश्वर बर्गे, उत्तेजनार्थ-जान्हवी रवींद्र हिरवे, स्वरीत राजेंद्र मोरे, गट क्रमांक दोन (तिसरी-चौथी)-कृष्णा महेश देशमुख (प्रथम), रईसा अमीर मुजावर, (व्दितीय), रोहन गजानन राठोड व वैष्णवी विजय माने (तृतीय), उत्तेजनार्थ वैष्णवी संदीप धनवे. गट क्रमांक तीन- (पाचवी ते सातवी)- अवनी नीलेश गायकवाड (प्रथम), रिया निरज बागुल (व्दितीय), आर्या सचिन पानसे, उत्तेजनार्थ नंदिनी मनोज यादव. खुला गट ः विनया विजय करमळकर (प्रथम), शर्वरी सागर गरुड (व्दितीय), रजनी पुराणे (तृतीय).


सातारा जिल्हा शिवछत्रपतींची भूमी आणि मराठा स्वराज्याची राजधानी आहे. त्यामुळे दर वर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. यंदा देखील माेठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. 

 वडूज येथे साकारले किल्ले रायगडची प्रतिकृती

पेरेंटस स्कूलची शिवजयंतीची मिरवणुक


हेही वाचा : Video : Shivjayanti2020 महाराज...आमचे ही रक्त सळसळतंय

हेही वाचा : शिवेंद्रसिंहराजे सुखरुप; पुढील उपचारार्थ मुंबईला रवाना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com