विराजचा अभिनय पाहून नागराज मंजुळेही प्रभावित 

अशोक मुरुमकर/गजेंद्र पोळ
रविवार, 25 मार्च 2018

अशी झाली विराजची निवड... 
पोफळज व शेटफळच्यामध्ये गव्हाणे वस्ती शाळा आहे. 38 मुलं येथे शिक्षण घेतात. नेहमी येथे विविध उपक्रम राबविले जातात. येथे विद्यार्थ्यांना नृत्य शिकवण्यासाठी "इतिहास'चे दिग्दर्शक गणेश निमगिरे गेले होते. विराजला एकदा सूचना दिल्यानंतर सर्व स्टेप्स तो बिनचूक करत होता. लघुपटासाठी त्यांना एका मुलाची आवश्‍यकता होती. त्यांना तो योग्य काम करेल असं वाटलं अन्‌ त्याची विचारणा केली.

सोलापूर/चिखलठाण : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होतात. त्यात काही व्यावसायिक तर काही सामाजिक भावनेतून तयार केलेले असतात. विराज आणि हार्दिकचा व्हिडिओ मात्र खूप वेगळा आहे. चित्रपट किंवा तत्सम कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेला विराज पहिलीत तर हार्दिक चौथीत जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. "आपण कुठं कमी नाहीत,' असंच त्यांनी यातून सिद्ध केलंय. सोशल मीडियाने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. आता त्यांना गरज आहे ती पाठबळाची. 

करमाळा तालुक्‍यातील शेटफळ (ना) येथील विराज प्रशांत नाईकनवरे हा जिल्हा परिषदेच्या गव्हाणे वस्ती (पोफळज) शाळेत पहिलीत शिकत आहे. त्याने "इतिहास' या लघुचित्रपटात काम केलं आहे. मागतकऱ्यांच्या पोरांची शिक्षणाची अवस्था कशी आहे हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे. विराजने केलेले हावभाव अन्‌ अभिनय कौतुकास्पद आहे. अवघ्या दोन दिवसांत याचं चित्रीकरण झालं असल्याचं सांगितलं जात आहे. विराजचे वडील प्रशांत यांनीही यामध्ये भूमिका साकारली आहे. विराज शाळेतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो. त्याचे हावभाव अन्‌ अभिनयाने शाळेतील कार्यक्रमात तीन हजारांचे बक्षीस मिळवलं होतं. 

मराठी चित्रपटसृष्टीचे जगभर नाव करणाऱ्या "सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळेही त्याच्या अभिनयाने प्रभावित झाले होते. दोन वर्षांपूर्वी "सैराट'चे सर्व डायलॉग त्याने नागराज यांना ऐकवले. तेव्हा त्यांनी त्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तीन वर्षांचा असताना त्याने पाटीवर कौतुकाची थाप मिळवली. ग्रामीण भागात एका वस्ती शाळेतील मुलगा आपल्या कलाकृतीने एवढं भुरळ पाडू शकतो ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. 

हार्दिकला 86 हजार व्हीवज्‌ 
गोंदिया जिल्ह्यातील कुऱ्हाडी (मलपुरी) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीत शिकणाऱ्या हार्दिक राजेंद्र रहांगडवाले या विद्यार्थ्याने नृत्य केलेल्या "पाण्याला निघाली गवळण' या गवळणीने सध्या फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत याला 86 हजार व्हीवज्‌ मिळाले आहेत. बोबड्या आवाजात गवळण गात त्याने नृत्य सादर केलं आहे. 

अशी झाली विराजची निवड... 
पोफळज व शेटफळच्यामध्ये गव्हाणे वस्ती शाळा आहे. 38 मुलं येथे शिक्षण घेतात. नेहमी येथे विविध उपक्रम राबविले जातात. येथे विद्यार्थ्यांना नृत्य शिकवण्यासाठी "इतिहास'चे दिग्दर्शक गणेश निमगिरे गेले होते. विराजला एकदा सूचना दिल्यानंतर सर्व स्टेप्स तो बिनचूक करत होता. लघुपटासाठी त्यांना एका मुलाची आवश्‍यकता होती. त्यांना तो योग्य काम करेल असं वाटलं अन्‌ त्याची विचारणा केली.

Web Title: Viraj Naiknaware acting skill Nagraj Manjule film