पेट्रोल दरवाढीचा सोशल मीडियावर भडका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सोलापूर : पेट्रोलचे दर वाढल्याने सारेच चिंता व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर तर उलटसुलट चर्चा रंगली आहे. आता कर्नाटकातील निवडणूक संपली म्हणून पेट्रोल दरवाढ केल्याच्या पोस्ट दिसून येत आहेत. सामान्य नागरिकांमधून सरकारबद्दल राग व्यक्त केला जात आहे. सोलापुरात बुधवारी पेट्रोल दर 85.84 इतका होता. 

सोलापूर : पेट्रोलचे दर वाढल्याने सारेच चिंता व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर तर उलटसुलट चर्चा रंगली आहे. आता कर्नाटकातील निवडणूक संपली म्हणून पेट्रोल दरवाढ केल्याच्या पोस्ट दिसून येत आहेत. सामान्य नागरिकांमधून सरकारबद्दल राग व्यक्त केला जात आहे. सोलापुरात बुधवारी पेट्रोल दर 85.84 इतका होता. 

पेट्रोल : 
डिसेंबर : 78.15 
जानेवारी : 81.31 
फेब्रुवारी : 81.76 
मार्च : 81.77 
एप्रिल : 83.06 
23 मे : 85.84 
-- 
डिझेल : 
डिसेंबर : 78.15 
जानेवारी : 81.31 
फेब्रुवारी : 81.76 
मार्च : 81.77 
एप्रिल : 83.06 
23 मे : 73.38 

नेटीझन्स म्हणतात.. 
सोलापुरात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. विविध टॅक्‍समुळे हे दर वाढले आहेत. सरकारने सामान्य नागरिकांचा विचार करावा. 
- संगीता रेळेकर 

आपले उत्पन्न वाढले की इंधन दरवाढीचे विचार येत नाहीत. 200 रुपयांची डाळ आता 65 मध्ये भेटते. भाजीपाला स्वस्त आहे, गहू, तांदूळ आणि इतर कितीतरी वस्तू आहेत ज्याच्या किमती स्वस्त झाल्या आहेत. नागरिकांनी पब्लिक ट्रान्स्पोर्टचा वापर करावा. सायकल वापरावी. जागतिक परिस्थिती बिघडत गेली तर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणारच आहेत. 
- सचिन जोशी 

इतक्‍या दिवस दर नियंत्रणातच होते. पण पाच महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. निश्‍चित यातून सुद्धा सामान्य माणसाला झळ बसणार नाही, असा प्रयत्न सरकार करेल हा मला विश्‍वास आहे. 
- प्रा. हिंदूराव गोरे 

सरकारने एकतर पेट्रोलचे दर तरी कमी करावेत, नाही तर रामदेव बाबाला सांगून गोमूत्रावर गाड्या चालवता येतील का? हे तरी विचारून बघावे. 
- राम गायकवाड 

ज्याप्रमाणे तांदळाचा तुटवडा असताना त्यावेळच्या पंतप्रधानांनी एक वेळचं भात न खाण्याचं आवाहन केलं होतं आणि ते लोकांनी पाळलं होतं. त्याप्रमाणे आठवड्यातून एक दिवस गाडी न वापरण्याचं आवाहन आताचे पंतप्रधान करतील का? लोक त्याला प्रतिसाद देतील का? 
- कुमार मिरजकर

Web Title: viral of increasing petrol prices on social media