वीरेंद्र तावडेचा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडेचा खटला आज जिल्हा न्यायालयात वर्ग झाला. त्याच्या न्यायालयीन कोठडीबाबतची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. न्यायालयाने पुढील सुनावणी 22 डिसेंबरला ठेवली आहे.

पानसरे हत्या प्रकरणातील संशयित तावडेला तपास यंत्रणनेने अटक केली. त्याच्यावर मागील सुनावणीत चार्जशीट दाखल केले. तावडेच्या न्यायालयीन कोठडीबाबतची सुनावणी आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात झाली. मागील सुनावणीवेळी तावडेचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयाकडे मागणी अर्ज केला होता. येरवडा कारागृहात गेल्यानंतर तावडेची भेट घेता आली नाही. त्यांच्याशी दाखल केलेल्या चार्जशीटबाबत चर्चा करायची आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत त्यांना हजर करावे असे म्हटले होते. त्यामुळे सुनावणीवेळी तावडेला तपास यंत्रणा हजर करण्याची शक्‍यता होती. मात्र आज सकाळी न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली. त्यांनी पुणे येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तावडेशी संपर्क साधून त्याला तपास यंत्रणेने दाखल केलेल्या चार्जशीटबाबतची माहिती दिली. हा खटला आता जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग झाल्याचे सांगितले. तसेच या खटल्याची पुढील सुनावणी त्यांनी 22 डिसेंबरला ठेवली. ही सुनावणी आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात होईल.

मुंबई उच्च न्यायालयात संशयित समीर गायकवाडवर चार्जफ्रेम दाखल करण्याबाबतची सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे. त्या सुनावणीत न्यायमूर्ती काय निर्णय देतील त्यावर समीरसह तावडेचा जामीन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे तावडेचे वकील ऍड. समीर पटवर्धन यांनी सांगितले.

Web Title: virendra tawde case in the District Court