काहीही झाले 'हा' समाज शिंदे कुटूंबीयांच्या पाठीशी..! 

परशुराम कोकणे
सोमवार, 29 जुलै 2019

सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोयरा या स्मरणिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी समाजाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे समाजाला देशपातळीवर ओळख मिळाली. त्यांनी समाजाला खूप काही दिले आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी मुंबईहून सोलापुरात प्रचारासाठी येणार आहे असल्याचे वीरशैव कक्कय्या महासंघाचे नेते साधू कटके यांनी सांगितले. काहीही झाले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी समाज उभा असल्याचे केशव इंगळे यांनीही स्पष्ट केले. 

सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोयरा या स्मरणिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी समाजाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपस्थित समाज नेत्यांनी शिंदे कुटूंबीयांसोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्थेच्या वतीने आगामी काळात विवाहांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितल्यानंतर श्री. शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधला. या कार्यक्रमात वीरशैव कक्कय्या ढोर समाजासाठी योगदान दिलेल्या बांधवांचा सत्कार करण्यात आला. 

या वेळी मंचावर कक्कय्या ढोर समाज महासंघाचे उपाध्यक्ष साधू कटके, सुशील विचारधारा संस्थेचे अध्यक्ष सच्चिदानंद व्हटकर, कार्याध्यक्ष केशव इंगळे, मनोज व्हटकर, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, गंगाधर जोगदनकर, साईनाथ कटके आदी उपस्थित होते. या वेळी उज्ज्वला शिंदे यांनी समाजासाठी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार उपक्रमांचे कौतुक करून प्रत्येक क्षेत्रात समाज पुढे येत आहे. ज्येष्ठांनी तरुणांचे विचार ऐकून घ्यावेत असा सल्ला दिला. मारुती कटकधोंड यांनी सूत्रसंचालन केले. अशोक सदाफुले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. अर्जुन व्हटकर, तुकाराम महाराज कोकणे, राजेश कटकधोंड, वासुदेव व्हटकर, गणेश कावळे, संजय जोगदनकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virshaiva community support to Sushilkumar Shinde family