विशाल गायकवाड यांची टिचर्स अॅक्टिव्हिटी ग्रुपच्या समन्वयक पदी निवड

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कांऊसिल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या विकासासाठी 'TEJAS' प्रकल्पांतर्गत Teacher Activity Group च्या समन्वयक पदी नगरपरिषद शिक्षण मंडळ मंगळवेढा संचालित न.पा.मुलांची शाळा क्र.५, साठे नगर येथे कार्यरत असणारे उपशिक्षक विशाल गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

तेजस प्रकल्प हा सन २०१८-१९ पासून संपूर्ण राज्यात राबविला जात आहे.या प्रकल्पात एकूण १८००० शिक्षकांना सहभागी करुन घेण्यासाठी ७५० Teacher Activity Group बनवले असून शासनाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातून २५० TAG Co-ordinatorsची online चाचणी व telephonic interview व्दारे नियुक्ती केली आहे. या प्रकल्पांतर्गत पुणे विभागातून फक्त ४० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.त्यापैकी जिल्ह्यातील २३ शिक्षकांची निवड झाली आहे.विशाल गायकवाड यांच्याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपूरी केंद्रातून सर्जेराव रूपनर तर सलगर केंद्रातून अरूण सरडे यांचीही निवड झाली आहे. याबाबत निवडीचे पत्र ई-मेलद्वारे दि.१४ ऑगस्ट रोजी प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबादचे संचालक यांनी पाठवले. 

या निवडीबद्दल त्यांचे आ.भारत भालके, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्ष नेते अजित जगताप,स्वच्छता व आरोग्य सभापती प्रवीण खवतोडे, महिला व बालकल्याण सभापती अनिता नागणे, जेष्ठ नगरसेविका भागिरथी नागणे, गटशिक्षणाधिकारी हणमंतराव कोष्टी, प्रशासनाधिकारी सचिन अनंतकवळस, केंद्र समन्वयक राजकुमार मांजरे, भारत नागणे, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब माने, सरचिटणिस संभाजी तानगावडे, न.पा.शिक्षक संघाचे अध्यक्ष भारत शिंदे, सरचिटणिस सुनिल शिंदे, मुख्य लिपिक आनंद हिरेमठ, सर्व नगरसेवक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishal Gaikwad elected as the coordinator of Teachers' Activities Group