केडगाव प्रकरण - विशाल कोतकरला कामरगावमध्ये अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नगर : केडगावमधील शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी व काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर याला कामरगाव शिवारात अटक करण्यात आली. शिवसैनिकांच्या दुहेरी हत्येप्रकरणी कोतकर हाच मास्टर माईंङ असल्याचा पोलिसांना संशय आहे. कोतकर याच्यासह अटकेतील आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.

निवडणुकीच्या वादातून हे हत्याकांङ झाल्याचे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या रवी खोल्लम याने पोलिसांना सांगितले आहे. खोल्लम याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. केडगाव येथे 7 एप्रिलला शिवसेनेचे शहर उपप्रमुख  कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून हत्या झाली होती. 

घटनेनंतर विशाल कोतकर फरार झाला होता. पोटनिवडणुकीत मतदानाच्या कारणावरून संजय कोतकर व खोल्लम यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर संजय कोतकर यांनी खोल्लमला धमकी दिल्याचे व सर्वच आरोप खोल्लमच्या बचावासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, आरोपी संदीप गुंजाळची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, बाबासाहेब केदार, संदीप गिऱ्हे व महावीर मोकळे, रवी खोल्लम 
यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Web Title: vishal kotkar arrested in kamargao in kedgao incidence