Loksabha 2019 : कमरेला बंदुक ही खासदाराची मर्दुमकी नव्हे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

"खासदार राजू शेट्टी यांनी वसंतदादांच्या घरावर केलेले प्रेम वाया जाणार नाही, याची दक्षता घेवू. वसंतदादांचे विचार टिकवणारी ही निवडणूक आहे. दादांनी शेतकऱ्यांची चळवळ सहकाररुपी उभारली. ती सहकारी संस्था उभारण्याची स्पर्धा होती. आता खासदार शेट्टी म्हणतात शेतकऱ्यांसाठी लढायचे. ही नैसर्गीक युती आहे.'' 

- विशाल पाटील

सांगली - संसदेत गेलेल्यांनी कमरेला बंदुक लावून फिरणे खासदाराला शोभणारी मर्दुमकी नव्हे. तुमची गुंडगिरी आम्ही तासगावमध्ये येऊन संपवतो, अशा शब्दात आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना आव्हान दिले.

येथील स्टेशन चौकात कॉंग्रेस महाआघाडीच्या प्रचार प्रारंभ सभेत ते बोलत होते. `आजवर संग बघितलाय आता जंग बघा` अशा शब्दात खासदारांनी औदुंबरच्या सभेत आव्हान दिले होते. 
यावर विशाल पाटील यांनी आज खासदार पाटील यांना लक्ष्य करताना थोडी इतिहासाचीही उजळणी केली. श्री. पाटील म्हणाले,"" तुम्ही आमदार सुमन पाटील यांना कोंडून ठेवले. हे अशोभनीय वर्तन खासदाराला शोभणारे नाही. आमची वसंतदादांची, प्रेमाची दादागिरी आहे. तुमची काकागिरी आता जिल्ह्याची जनता खपवून घेणार नाही. खासदार म्हणून तुम्ही संसदेत किती बोललात? केवळ मोठ - मोठ्या थापा मारण्यात पाच वर्षे गेली. केंद्राकडून निधी आणण्यात अपयश आले. भाजपच्या काळात म्हैसाळसाठी केवळ 74 कोटी आले. अन्य योजनांना निधीच आला नाही. प्रतिक पाटील मंत्री असताना एक हजार कोटी आणले होते. खासदारांचे गेल्या पाच वर्षातील रिपोर्ट कार्डच काढले तर फक्त दादागिरी गुंडगिरीच आहे.

"खासदार राजू शेट्टी यांनी वसंतदादांच्या घरावर केलेले प्रेम वाया जाणार नाही, याची दक्षता घेवू. वसंतदादांचे विचार टिकवणारी ही निवडणूक आहे. दादांनी शेतकऱ्यांची चळवळ सहकाररुपी उभारली. ती सहकारी संस्था उभारण्याची स्पर्धा होती. आता खासदार शेट्टी म्हणतात शेतकऱ्यांसाठी लढायचे. ही नैसर्गीक युती आहे.'' 

- विशाल पाटील

Web Title: Vishal Patil comment