विश्रामबाग उड्डाणपूल होणार दीड महिन्यात पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सांगली - विश्रामबाग येथील उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपली तरी ९० टक्केच काम पूर्ण झाले आहे. खोकीधारकांचे पुनर्वसन, पोलिस लाइनची भिंत आणि विजेचे खांब असे अडथळे पार करीत अखेर काम मार्गी लागले. पुढील दीड महिन्यात सर्व काम पूर्ण करू, अशी ग्वाही ठेकेदार टी ॲण्ड टी कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.

विश्रामबाग रेल्वेगेटवर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीला पर्याय म्हणून विश्रामबाग चौक ते वारणाली गेटपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामाचा निधी मंजूर झाल्यानंतर तातडीने बांधकामाला सुरवात करण्यात आली. दिवसा आणि रात्री दोन टप्प्यांत काम सुरू झाल्याने पहिल्या तीन महिन्यांत कामाला गती आली. त्यानंतर वर्षाची मुदत उलटून गेली, तरी काम अपूर्ण आहे. खोकी पुनर्वसनासाठी मंगळवार बाजाराकडे जाणाऱ्या खुल्या भूखंडाचा पर्याय प्रशासनाने पुढे आणला होता. तेथे ही खोकी केल्याने अडथळे निर्माण होणार आहेत. प्रत्यक्षात किती खोकी आहेत, त्यासाठी जागा किती लागेल, याचे मोजमाप अजूनही प्रशासनाने केले नाही. त्यामुळे पुलाचे बांधकाम रखडले आहे. प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. 

पोलिस लाइनची भिंत आणि विजेच्या खांबाचा अडथळाही काही महिन्यांपासून होता. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यावर तोडगा काढण्यात आला असून, पोलिस प्रशासनाने जागा दिली आहे. त्या भागात कामाला सुरवात करण्यात आली. अजूनही दीड महिना पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी लागेल.

Web Title: Vishrambag Overbridge