धावपट्टीवर अवतरले दृश्‍यमानतेचे दिवे! 

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शिर्डी ः दृश्‍यमानता कमी असताना विमानसेवा सुरू ठेवू शकणारी आणि रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्‍यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित न करताच शिर्डी विमानतळ सुरू करण्यात आले होते. परिणामी धुक्‍यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून विमानसेवा बंद होती. 

शिर्डी ः दृश्‍यमानता कमी असताना विमानसेवा सुरू ठेवू शकणारी आणि रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्‍यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित न करताच शिर्डी विमानतळ सुरू करण्यात आले होते. परिणामी धुक्‍यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून विमानसेवा बंद होती. 

पुढील आठ दिवसांत शक्‍य 
आता तात्पुरत्या स्वरूपात बसविलेल्या यंत्रणांची केंद्र सरकारच्या "डीजीसीए'च्या तज्ज्ञांनी पाहाणी करावी. सूर्यप्रकाश असताना विमानसेवा सुरू करण्यास मान्यता द्यावी. यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले तर पुढील आठ दिवसांत हे विमानतळ सुरू होऊ शकते. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. 

हेही वाचा 93 वर्षांच्या "तरुणा'पुढे चोर फेल 
 

"डीजीसीए' कधी येणार 
येथे "डीव्हीओआर' ही यंत्रणा बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यामुळे दृश्‍यमानता कमी असताना पूर्वीच्या तुलनेत बऱ्यापैकी विमानसेवा सुरू ठेवता येईल, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. "आयएफआर' हे विमानतळाचे मानांकन आहे. या दोन्ही बाबींचे निरीक्षण करण्यासाठी डीजीसीए (डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एवीएशन)चे पथक येणे आवश्‍यक आहे. त्यांची मान्यता मिळाली की लगेचच विमानतळ पुन्हा सुरू होऊ शकेल. 

अधिकारी दिल्लीत ठाण मांडून 
अर्थात त्यामुळे सध्याची समस्या अंशतः सुटेल. हे पथक तातडीने येथे यावे यासाठी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी गेल्या चार-पाच दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. "डीजीसीए'च्या अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी याबाबत काल लोकसभेत प्रश्‍नदेखील उपस्थित केला होता. 

हेही वाचा भाऊसाहेब ऍडमिट आहेत 

अनुभव नसल्याने खेळखंडोबा 
विमानतळ चालविण्याचा अनुभव असलेल्या एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे शिर्डी विमानतळ त्वरित हस्तांतरित करावे. या मागणीसाठी आपण नागरी उड्डायनमंत्री हरदीपसिंह पुरी यांची भेट घेतली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाला कुठलाही अनुभव नसल्याने हा खेळखंडोबा सुरू आहे. 
- खासदार सदाशिव लोखंडे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Visibility on the shirdi airport runway!