"वालचंद'मध्ये आज "व्हिजन' उपक्रमाचे उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

सांगली - वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी (ता. 10) सकाळी 9 वाजता "व्हिजन -2017' या तांत्रिक स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील विविध महाविद्यालयांतून दीड हजारांवर विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. बी. जी. पाटील यांनी दिली. या उपक्रमासाठी "सकाळ' माध्यम प्रायोजक आहे. 

या कार्यक्रमासाठी रिजनल लॅबोरेटरी फॉर अप्लाईड रिसर्च अँड डेव्हलपमेंट, पुणे या संस्थेचे डिरेक्‍टर मनीष पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

श्री. पाटील म्हणाले, ""यंदा व्हिजनचे 29 वे वर्ष असल्याने व्यापक रूप देण्यात आले आहे. अभियांत्रिकीच्या सहा शाखांसाठी क्विज, पेपर प्रेझेंटेशन व व्यवस्थापक कौशल्य स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. सामाजिक बांधीलकी जपणारी "अवेकन्स्‌' ही स्पर्धा मुख्य आकर्षण असेल. संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कोडिंग स्पर्धा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर रोबोटिक्‍स्‌ स्पर्धाही होईल.'' 

या वेळी वालचंद महाविद्यालयाचे डिरेक्‍टर प्रो. डॉ. जी. व्ही. परिशवाड, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. बी. जी. पाटील, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी प्रांजली परांजपे, पवन बिरादार, ऐश्‍वर्या कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने 11 मार्चला सायंकाळी 5.30 वाजता होईल. 

विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन 
शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रयोगही "व्हिजन'मध्ये ठेवले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन हा उपक्रमही राबवण्यात येणार आहे. तरी शालेय विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक चैतन्य कुलकर्णी, प्रांजली परांजपे यांनी केले आहे.

Web Title: Vision initiative was inaugurated today in WALCHAND