१० लाखांच्या जिवंत मांडूळाची पोलिसांनी केली जप्ती....

Vita police have arrested mandul smuggling
Vita police have arrested mandul smuggling

विटा - येथे विनापरवाना जिवंत मांडुळाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला विटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. सुरेश संगाप्पा कांबळे (वय ३८, गार्डी, ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून अंदाजे दहा लाख रुपये किमतीचे मांडूळ पोलिसांनी ताब्यात घेतले. तर हे मांडूळ पकडून विक्रीसाठी कांबळे याच्याकडे देणाऱ्या संदीप सुबराव कदम (कदममळा, गार्डी) याच्यावरही गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

पिशवीतून मांडूळ घेऊन जाणार्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले

पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांना खबऱ्याद्वारे कांबळे हा मांडूळ तस्करीसाठी विटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्री. कन्हेरे यांच्यासह पोलिस हवालदार विक्रम गायकवाड, कुलदीप कुंभार, नवनाथ देवकाते यांनी विटा येथे विटा- साळसिंगे रस्त्यावर सापळा रचला. आयटीआय कॉलेजजवळ पिशवीतून मांडूळ घेऊन पायी चालत विट्याकडे येत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले.  पिशवीत पाहिले असता त्यात एक जिवंत मांडूळ असल्याचे दिसले. त्यास पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नांव सुरेश कांबळे असल्याचे सांगितले. तसेच हे मांडूळ संदीप कदम याने पकडून देऊन विक्रीसाठी कांबळे याच्याकडे दिले. 
या दोघांविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे श्री. शेळके यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com