खानापूर तालुक्‍यात बारा गावात ‘एक गाव-एक गणपती’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

विटा - पावसाने मारलेली दडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशी दुष्काळी स्थिती असतानाही  गणेशाचे मोठ्या उत्साहात स्वागत करून विटा शहर व खानापूर तालुक्‍यात १३६ सार्वजनिक मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. गतवर्षी १३२ मंडळे होती. आता त्यात चार मंडळांची वाढ झाली आहे. डॉल्बीमुक्तीला फाटा देऊन पारंपरिक ध्वनिक्षेपकांचा वापर उत्सव  काळात सुरू आहे. तालुक्‍यातील ६५ गावांपैकी १२ गावांत एक गाव- एक गणपती संकल्पना राबविली आहे. 

खानापूर तालुक्‍यातील लोकांना सतत दुष्काळी स्थितीला सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. परंतु मोठे पाणीसाठे होण्याइतपत पाऊस पडला नाही. त्यामुळे खरिपाच्या मशागती, पेरण्या यासह अन्य खर्चाने आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी लाडक्‍या बाप्पाचे मात्र मोठ्या उत्साहात  स्वागत करून प्रतिष्ठापना केली आहे. विटा शहरात २६ सार्वजनिक मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. तर तालुक्‍यातील सुलतानगादे, करंजे, अडसरवाडी, बाणूरगड, कळंबी, रामनगर, ऐनवाडी, पोसेवाडी, धोंडगेवाडी, देवनगर, ढोराळे, सांगोले या बारा गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबविली आहे. विटा पोलिसांनी तालुक्‍यातील गावामध्ये जाऊन डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करा, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानुसार डॉल्बीमुक्त गणेशोत्सव सुरू आहे. काही गणेश मंडळांनी समाज प्रबोधन करणारे जिवंत देखावे उभारले आहेत.

Web Title: vita sangli news ek gav ek ganpati in khanapur tahsil 12 village