माढ्यात आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल महोत्सवाचे आयोजन

किरण चव्हाण
शुक्रवार, 20 जुलै 2018

माढा (सोलापूर) : सोमवारी (ता. 23) माढ्यात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त माढा नगरपंचायत, विविध भजनीमंडळे व माढ्यातील नागरिकांच्यावतीने श्री विठठल महोत्सवाचे आयोजन केल्याचे पुजारी बापू कुंभेजकर यांनी सांगितले.  

विठठलाचे रूप अतर्क्य विशाळ । ह्रदयकमळ मंत्रसिध्द ।।
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ।।
कटीवर हात,हाती पदय शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ।।
सावता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें। नाम विठठलाचे कलियुगी ।।

संतश्रेष्ठ सावता माळी यांच्या अभंगात वर्णिलेल्या व आद्य मूर्तीची लक्षणे दाखविणाऱ्या माढ्यातील ऐतिहासिक श्री विठठलाच्या मूर्तीचा श्री विठठल महोत्सव दरवर्षीप्रमाणे माढा नगरपंचायत, माढ्य़ातील नागरिक व विविध भजनीमंडळाच्या वतीने देवशयनी आषाढी एकादशी दिवशी सोमवारी (ता. 23) आहे.

श्री विठठल महोत्सावानिमित्त सोमवारी (ता. 23) पहाटे चार वाजता श्री विठ्ठलरूक्मिणी महाभिषेक व महापूजा  होणार आहे. पहाटे पाच
पासून श्री विठठल रूक्मिणी दर्शन, नामसंकिर्तन होणार आहे.  सकाळी सहा वाजता भाविकांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता विविध भजनी मंडळे, भाविक व नागरिकांच्या सहभागाने श्री. विठठलच्या दिंडींची नगरप्रदक्षिणा होणार आहे. रात्री नऊ वाजता ह.भ.प. गोरक्ष पारणेकर महाराज यांच्या कीर्तन होणार आहे. भाविक भक्तांनी या विठठल महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवहन संयोजकांनी केले आहे. 

पंढरपूरहून आषाढी एकादशीदिवशी श्री विठठलाचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक माढय़ातील श्री. विठठलाच्या दर्शनाला येत असतात. सध्या मंदिर सजावट व परिसर स्वच्छतेची कामे सुरू असून माढयातील श्री विठठल महोत्सवाच्या निमित्ताने भक्तीमय वातावरण आहे.

Web Title: vitthal mahotsav organised at madha solapur