"विवेकानंद'मध्ये नव्या संकल्पना राबविणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

कोल्हापूर - "माझा अजेंडा हा वैयक्तिक नसून देशाच्या व राज्याच्या हिताचा असतो. याच तत्त्वास अनुसरून श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या विकासासाठी काम करेन, दैनंदिन कामकाजात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ न करता पक्षीय राजकारणविरहित राहून नवनव्या संकल्पना संस्थेच्या विकासासाठी राबविल्या जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर - "माझा अजेंडा हा वैयक्तिक नसून देशाच्या व राज्याच्या हिताचा असतो. याच तत्त्वास अनुसरून श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या विकासासाठी काम करेन, दैनंदिन कामकाजात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ न करता पक्षीय राजकारणविरहित राहून नवनव्या संकल्पना संस्थेच्या विकासासाठी राबविल्या जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज संस्थेच्या मुख्यालयात सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे, सहसचिव अशोक कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही राज्यातील नामांकित शिक्षण संस्था असून राज्यभर संस्थेचा विस्तार आहे. इतक्‍या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आभार व्यक्त करून संस्थेच्या हिताबद्दल विश्वस्तांनी मोकळेपणाने बोलावे. त्यातील बारकावे समजून घेऊन संस्थेच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली. संस्थेने व्यक्त केलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे सांगून पक्षीय राजकारणविरहित काम करेन. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील संकल्पनांचे आदान-प्रदान करण्यात येईल, असे सांगून कौशल्य विकासासाठी येत्या काळात काम करणे आवश्‍यक आहे. संस्थेने त्यासाठीचे प्रस्ताव तयार करावेत, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. साळुंखे म्हणाले, ""संस्थेच्या व्यापक हितासाठी राजाश्रय आवश्‍यक आहे. चांगल्या माणसांनी नेतृत्व केल्यास शिक्षण क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. या बदलांसाठी चंद्रकांत पाटील यांचा साधेपणा व सच्चेपणा भावणारा आहे. येत्या काळात वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच एमबीए, बीएस्सी नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज यांचीही सुरवात करण्याचा मानस आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा करावा.‘‘ तत्पूर्वी श्री. पाटील यांनी विवेकाननंद महाविद्यालयाच्या परिसरातील बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: "Vivekananda' implemented in the new concept