जोतिबाचे दर्शन घ्या अन् मतदान करा

निवास मोटे
Sunday, 6 October 2019

जोतिबा डोंगर  - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निमित्ताने मतदाराला मात्र देवदर्शनाची आयती संधी मिळत आहे. परिणामी ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांनाही महत्त्व आले आहे.

जोतिबा डोंगर  - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निमित्ताने मतदाराला मात्र देवदर्शनाची आयती संधी मिळत आहे. परिणामी ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांनाही महत्त्व आले आहे.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर याठिकाणी तर दररोज दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील मतदारांना पाठवण्यात असून डोंगरावर रोज दीड दोनशे गाड्यांचा ताफा येताना दिसत आहे.

आपला उमेदवार निवडणुकीत विजयी व्हावा, असे साकडे प्रमुख कार्यकर्ते मंदिरात घालताना दिसत आहेत. काही उमेदवारांनी तर आपल्या प्रचाराचा प्रारंभ या मंदिरातून केला आहे. गेल्या आठवडाभरापासून डोंगरावर राज्यातील मतदाराला नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जोतिबा दर्शनाची आयती संधी मिळू लागली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण या भागातील मतदारांना डोंगरावर पाठवण्यात येत असून ट्रॅव्हल्स मिनी बस जीप या गाड्यांचा ताफा डोंगरावर दररोज येताना दिसत आहे.

काल व आज तर रविवार असल्याने सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. या गर्दीचे चित्र येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत दिसेल.

मतदार सोबतही येणाऱ्या मोहरक्या उमेदवाराच्या मर्जीतून मिळालेल्या दक्षिणेतून पूजा साहित्यापासून ते हॉटेल जेवणापर्यंत खर्च करताना दिसत आहे. डोंगरावर येणारे सऱ्यास मतदार तर आपला उमेदवार विजय व्हावा, यासाठी हात जोडून साकडे घालताना दिसत आहे.

डोंगरावरील हॉटेलना तर जत्रेचे स्वरूप आले आहे. निवडणूक असल्यामुळे डोंगरावर गर्दीत दररोज मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. मंदिरातील यंत्रणेवर तान पडताना दिसत आहे. विधानसभा निवडणूकीत ज्या ज्या उमेदवारांची विजयाची खात्री आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज डोंगरावर गुलाल खरेदी केला. काही कार्यकर्त्यांनी रविवार व चांगला दिवस आहे, म्हणून खास निवडणूकीसाठी येथील गुलाल गावाकडे नेला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters have trip to Jotiba Dongar