Vidhan Sabha 2019 : मतदानासाठी रात्री साडे दहापर्यंत लागली मतदारांची रांग!

हुकूम मुलाणी
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

यंत्र संथ चालत असल्यामुळे शेतीच्या आणि घरगुती कामासाठी काही मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. 

मंगळवेढा : व्हीव्हीपॅट यंत्र संथ गतीने चालत असल्यामुळे लवंगी (ता. मंगळवेढा) येथे रात्री साडेदहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. तर हुन्नुर आणि निंबोणी या दोन्ही ठिकाणी व्हीव्हीपॅटमध्ये झालेला तांत्रिक बिघाड वगळता तालुक्यांमध्ये सर्वत्र शांततेत मतदान झाले.

- Vidhan Sabha 2019 सातारा जिल्ह्यात 'येथे' झाले शून्य टक्के मतदान

यंत्र संथ चालत असल्यामुळे शेतीच्या आणि घरगुती कामासाठी काही मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. काल रात्री झालेल्या पावसामुळे सकाळी संथ गतीने मतदान सुरू होते; दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली. 

- Vidhan Sabha 2019 : मतदानासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा!

निंबोनी आणि हुन्नुरमध्ये दुपारच्या सुमारास व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल दोन तास मतदारांना रांगेत तिष्ठत राहावे लागले. दुसऱ्या यंत्रांची सोय करेपर्यंत बराच वेळ गेला. त्यामुळे मंगळवेढा शहरातील काही केंद्रांसह खुपसंगी, हुन्नुर, भाळवणी, निंबोनी, लवंगी, मारापूर आणि आंधळगाव या गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिली.

भाजपा-शिवसेना महायुतीचे सुधाकर परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके, अपक्ष उमेदवार समाधान अवताडे, काँग्रेसचे शिवाजी काळुंगे या मंगळवेढा तालुक्यातील उमेदवारांमध्येच चौरंगी लढत झाली.

- EXIT Poll : महाराष्ट्रात पुन्हा युती सरकार; असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज

सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters standing in election booth at late night in Mangalvedha for Vidhan Sabha election 2019