इस्लामपूरात मतदान जागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

धर्मवीर पाटील
शनिवार, 20 एप्रिल 2019

इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली, संस्कृती, मेट्रो, पर्ल यंग जायंट्स व यंग सहेली यांच्यासह विवेकवाहिनी, इंजिनिययर्स असोसिएशन, क्रेडाई, इस्लामपूर व इंडियन मेडिकल असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक, जिव्हाळा ग्रुप, सराफ असोसिएशन आदी संघटना सहभागी झाल्या. कबड्डीस्टार व आंतरराष्ट्रीय खेळाडू नितीन मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.

रॅलीत दोन चित्ररथ, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, वाळवा पंचायत समिती, नगरपालिकेचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.

प्रांताधिकारी नागेश पाटील, कबड्डीपटू नितीन मदने, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याहस्ते काहींना प्रातिनिधिक आवाहन पत्राचे वाटप करण्यात आले. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो यासह अन्य घोषणा देण्यात आल्या. 

पेठ रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शिराळा नाका, आण्णासाहेब डांगे चौक, भाजी मंडई, कापूसखेड नाका, यल्लाम्मा चौक, गांधी चौक या मार्गे निघाली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मानवी साखळी करण्यात आली.

गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी मानवी साखळीतील सर्वांना 'मी मतदान करणारच' अशी शपथ दिली. लोकशाहीच्या घोषणा देण्यात आल्या. राजारामबापू पाटील नाटयगृहात रॅलीचा समारोप झाला. सुधाताई सदाशिव पाटील कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी मतदार जागृतीबाबतचे पथनाट्य सादर केले.
बागणीकर यांच्या पथकाचा पोवाडा झाला.

नागेश पाटील म्हणाले, "प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाच्या प्रक्रियेत वंचित घटक यावेत यासाठी विशेष प्रयत्न करावेत. सर्वानी इतरांना आपल्या सोबत घ्यावे."

नितीन मदने म्हणाले, "लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा सहभाग लक्षणीय हवा. मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत."

संजय बनसोडे, डॉ. सीमा पोरवाल, माधुरी यादव, डॉ. सुवर्णा माळी, श्रद्धा कुलकर्णी, संदीप राठी, प्रशांत माळी, अध्यक्ष सुनील तवटे, डॉ. सुरभी यादव, देवेंद्र साळुंखे, विकास गावडे, उमेश रायगांधी, सर्जेराव जगताप, डॉ. अनिल माळी, सरिता पाटील, ज्योती माळी, मीनल दीक्षित, जितेंद्र रायगांधी, ईश्वरी कोठारी, सुजाता डबाणे, एस. आर. पाटील, प्रा. संदीप पाटील, आबासाहेब पाटील, उमेश कुरळपकर, राजू देसाई, वीरेंद्र राजमाने उपस्थित होते. धर्मवीर पाटील, संग्राम पाटील, अमृत शिंगण, संदीप पाटील, संतोष कागले, शिवकुमार पाटील, छाया माळी, अरविंद कोळी, स्वप्निल पाटील संयोजन केले.

बागणीकर पथकाचे पोवाडे

शाहीर आलम रमजान उर्फ बागणीकर यांच्या पथकाने पोवाडे सादर केला. या पथकात दस्तागिर शेख, पांडुरंग सुतार, शैपुदिन म्हाब्रि, चांगदेव बनसोडे, राजू कांबळे यांचा सहभाग होता.

Web Title: Voting awareness movement in Islampur Sakal Event