सुसज्ज आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात सांगलीत उत्साहात मतदानास प्रारंभ 

Voting begins in Sangli with a well-equipped health system
Voting begins in Sangli with a well-equipped health system

सांगली ः निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच आरोग्य अधिकाऱ्यांसह सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतदानास प्रारंभ झाला. कधी नव्हे ती अभूतपूर्व अशी तयारी निवडणूक यंत्रणेने यावेळी केली आहे. दरम्यान सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या उत्साहाने जिल्ह्यात आज सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी आठनंतर मतदानासाठी गर्दी दिसू लागली. 


कुपवाड केंद्रावर पोलिंग एजंट नव्हते.त्यामुळे मतदानास सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी प्रारंभ झाला. त्यामुळे मतदारांची गैरसोय झाली. उमेदवार व माजी आमदार शरद पाटील यांनी मतदान केंद्राकडे तत्काळ धाव घेतली. दरम्यान शहरातील बापट बाल, म.के. आठवले, ग.रा.पुरोहित, शांतिनिकेतन येथील मतदान केंद्रावर आज सकाळपासून कार्यकर्ते जय्यत तयारीसह दाखल झाले होते. जागोजागी टेबल मांडली होती. मतदारांना आधीपासून आपला बुथ क्रमांक, अनुक्रमांक माहित असल्यामुळे कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती एवढेच काम होते.

अनेक मतदारांना केंद्राचे दोन दोन ऑप्शन होते. त्यामुळे नेमके कोणत्या केंद्रावर मतदान आहे हे शोधताना तारांबळ उडत होती. शिक्षक व पदवीधर अशा दोन्ही ठिकाणी मतदान असणाऱ्यांची अधिक धावपळ उडत होती. एकूण सकाळच्या थंडीतील मतदानाचा उत्साह वेगळा होता. मतदारांची गर्दी कमी आणि कार्यकर्ते जास्त असे जागोजागी चित्र होते. एरवीच्या निवडणुकीपेक्षा मतदारांना यावेळी अधिक आदर जाणवत होता. 

 
मतदारांची पळापळ 
पंधरा किलोमीटरच्या परिसरातील केंद्रावर मतदान केंद्र या सूत्रानुसार बुथरचना होती. त्यामुळे एकाच गावातील मतदारांना मतदानासाठी वेगवेगळ्या केंद्राव जावे लागले. हरिपूरमधील काही मतदारांना सांगलीत आणि मिरजेत जावे लागले. केंद्र शोधताना त्यांची चांगली पळापळ झाली. शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्हीकडे मतदान असलेल्यांची अधिक धावपळ झाली. मात्र केंद्रावर गर्दी नसल्याने रांग हा प्रकार नसल्याने मतदानही जलद होत होते. 
 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com