मतदार यादी सर्वेक्षणात शिक्षकांचीच ‘शाळा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - मतदार यादी सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) नेमले जाते. अध्यापन करत हे अशैक्षणिक काम त्यांना करावे लागते. मात्र काही शिक्षकांनी परस्पर मदतनीस नेमले आहेत. हे मदतनीस सर्वेक्षणाचे काम करतात आणि शिक्षक ‘बीएलओ’च्या नावाखाली शाळेत गैरहजर राहून स्वतःची कामे करतात, अशी ‘शाळा’ मास्तरांनी केल्याचे उघड झाले आहे. ‘बीएलओ’ म्हणून काम न करणाऱ्या अशा तिघांवर जिल्ह्यात काही महिन्‍यांपूर्वी गुन्हाही दाखल झाला आहे. 

जिल्हा निवडणूक विभागाकडून शिक्षकांची नेमणूक ‘बीएलओ’ म्हणून केली जाते. त्यांनी घरोघरी जाऊन मतदार यादीचे सर्वेक्षण करायचे असते. यात नावातील बदल, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, नवीन मतदाराच्या नावाची नोंद करणे, ही कामे ते करतात. जिल्ह्यात असे ३२८५ बीएलओ कार्यरत आहेत. पण काही शिक्षकांनी शक्कल लढवली आहे. हे काम करण्यासाठी मदतनीस नेमले. मिळणारे मानधन ते त्यांना देतात. हे मदतनीस सर्वेक्षणाचे काम करतात. पण बीएलओचे काम आहे, असे सांगून काही शिक्षक शाळेला न जाता वैयक्तिक कामे करतात. वास्तविक शिक्षकांनी शैक्षणिक तासांच्या व्यतिरिक्त हे काम करायचे आहे. पण शिक्षकांनी सोयीस्करपणे या नियमाला बगल दिली आहे. जिल्ह्यातील तीन शिक्षक बीएलओ म्हणून गैरहजर असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या तिघांवर फौजदारी गुन्हाही दाखल झाला आहे.

शिक्षकांनी बीएलओचे काम करण्यासाठी मदतनीस नेमल्याची कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही. तक्रार आल्यास त्या शिक्षकाची चौकशी करून कारवाई करू.
- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

शिक्षकांना शिक्षणेतर कामे लावू नयेत, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. पण तरीही प्रशासन शिक्षकांना बीएलओ म्हणून काम करण्यास सांगतात. हा न्यायालयाचा अवमान आहे.
- एस. डी. लाड, अध्यक्ष, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ

Web Title: Voting List Survey Teacher