वाडिया हॉस्पिटल चालू करण्याच्या प्रक्रियेला पुन्हा गती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

चांगली संस्था पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. लवकरच बैठक घेऊन पहिला टप्पा सुरू करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हॉस्पिटलचे काम सुरू होईल. 
- शिरीष गोडबोले, विश्‍वस्त

सोलापूर : वाडिया हॉस्पिटल पुन्हा चालू व्हावे, यासाठी समविचारी मंडळींनी एकत्र येऊन प्रयत्न चालविले आहेत. कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणात सचिव आर. आर. राठी यांना धर्मादाय आयुक्तांनी बाजूला काढले आहे. आता लवकरच बैठक घेऊन पहिल्या टप्प्यातील हॉस्पिटल सुरू करण्यासाठी चर्चा होणार आहे. 

पुण्याचे प्रभाकर करंकदीकर हे वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल या न्यासाचे 2006 पासून अध्यक्ष आहेत. न्यासाचे सचिव म्हणून रामचंद्र रामप्रसाद राठी हे काम पाहात होते. त्यांना धर्मादाय आयुक्तांनी या पदावरून काढले आहे. राठी यांनी रुग्णालय बंद ठेवून अध्यक्ष करंदीकर यांना प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. या प्रकरणी करंदीकर यांनी 2012 मध्ये सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. सोलापूर वाडिया हॉस्पिटल 2008 पर्यंत चालू होते. अंतर्गत राजकारण आणि अन्य तत्कालीन कारणांमुळे हॉस्पिटल बंद पडले आणि कुलूप लावावे लागले. समविचारी मंडळींनी एकत्र येऊन पुन्हा एकदा हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच बैठक घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचे काम सुरू होईल, असे विश्‍वस्त शिरीष गोडबोले यांनी सांगितले. 

चांगली संस्था पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. लवकरच बैठक घेऊन पहिला टप्पा सुरू करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हॉस्पिटलचे काम सुरू होईल. 
- शिरीष गोडबोले, विश्‍वस्त

Web Title: wadia hospital in Solapur