अध्यक्ष करंदीकरांनी घेतला वाडिया हॉस्पिटलचा ताबा 

परशुराम कोकणे
बुधवार, 25 जुलै 2018

सोलापूर : रुग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि 2010 पासून बंद पडलेले एन. एम. वाडिया चॅरिटेबल ट्रस्टचे हॉस्पिटल पुन्हा एकदा चालू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अध्यक्ष पी. डी. करंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॉस्पिटल परिसराचा ताबा घेतला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्यावतीने मालमत्तेच्या तपासणीला सुरवात झाली आहे. 

सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर हे वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल या ट्रस्टचे 2006 पासून अध्यक्ष आहेत. सचिव म्हणून रामचंद्र रामप्रसाद राठी हे काम पाहात होते. त्यांना धर्मादाय आयुक्तांनी या पदावरून काढले आहे. राठी यांनी रुग्णालय बंद ठेवून अध्यक्ष करंदीकर यांना प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. या प्रकरणी करंदीकर यांनी 2012 मध्ये सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. सोलापूर वाडिया हॉस्पिटल 2010 पर्यंत चालू होते. अंतर्गत राजकारण आणि अन्य तत्कालीन कारणांमुळे हॉस्पिटल बंद पडले आणि कुलूप लावावे लागले. समविचारी मंडळींनी एकत्र येऊन पुन्हा एकदा हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बुधवारी सकाळी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत वाडिया हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष पी.डी.करंदीकर यांनी हॉस्पिटलचा ताबा घेतला. यावेळी करंदीकरांना सहकार्य म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियुक्त केलेले शिरीष गोडबोले, अनिल बर्वे, डॉ. आनंत भागवत तसेच हेमंत चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रंगनाथ बंकापूर आदी उपस्थित होते. 
-- 
कोट : 
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत आज आम्ही हॉस्पिटलचा ताबा घेतला आहे. मालमत्तेची तपासणी करण्यात येत आहे. हॉस्पिटलमधील जुने साहित्य नादुरुस्त झाले आहे. इमारतीचा काही भाग मोडकळीस आला आहे. महापालिकेचे कर, एमएसईबीच्या बीलासोबतच कामगारांच्या देणी आहेत. खर्चाचा अंदाज घेऊन पुढील वाटचाल करण्यात येईल. टप्याटप्याने हॉस्पिटल चालू करण्यात येईल. यासाठी आम्हाला सोलापूरकरांची मदत लागणार आहे. 
- पी.डी. करंदीकर, 
अध्यक्ष, वाडिया हॉस्पिटल ट्रस्ट

Web Title: wadia hospital take over by president karandikar solpaur