वाघझरी तलाव बनला 'ओपन बार'

सदानंद पाटील
गुरुवार, 16 जानेवारी 2020

कोल्हापूर : आंबा-विशाळगड मार्ग म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. जंगलाच्या सुरुवातीलाच तलावाचे नयनरम्य दृश्‍य, गर्द झाडीतील लांबलचक रस्ते, वेडीवाकडी वळणे आणि या घनदाट जंगलाच्या मधोमधच असलेले वाघझरी तलाव. पट्टेरी वाघ या ठिकाणी सतत पाणी पिण्यास येत असल्याने या तळ्याला वाघझरी असे नाव पडले. रात्री उशीरापर्यंत येथे वाघांसह इतर जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. मात्र अलिकडच्या काळात हे तळे "ओपन बार' बनला आहे. तळ्याच्या काठावर पर्यटकांसाठी केलेल्या विश्रांती ठिकाणाचा वापर पार्टी अडडा म्हणून झाला आहे.

कोल्हापूर : आंबा-विशाळगड मार्ग म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. जंगलाच्या सुरुवातीलाच तलावाचे नयनरम्य दृश्‍य, गर्द झाडीतील लांबलचक रस्ते, वेडीवाकडी वळणे आणि या घनदाट जंगलाच्या मधोमधच असलेले वाघझरी तलाव. पट्टेरी वाघ या ठिकाणी सतत पाणी पिण्यास येत असल्याने या तळ्याला वाघझरी असे नाव पडले. रात्री उशीरापर्यंत येथे वाघांसह इतर जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. मात्र अलिकडच्या काळात हे तळे "ओपन बार' बनला आहे. तळ्याच्या काठावर पर्यटकांसाठी केलेल्या विश्रांती ठिकाणाचा वापर पार्टी अडडा म्हणून झाला आहे. परिसरात मद्याच्या बाटल्या, कोंबड्यांची पिसे,प्लॅस्टिक पडल्याने याचा परिणाम प्राण्यांच्या वास्तव्यावर होत आहे. 

आंबा तर राज्यातील एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आले आहे. आंबा येथून विशाळगड या इतिहास प्रसिध्द किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. तर ऐतिहासिक पावनखिंडसाठीही याच मार्गावरुन जावे लागते. आंबा-विशाळगड या रस्त्याला दररोज शेकडो पर्यटक असतात. यातील निम्म्या पर्यटकांचा ठिय्या हा वाघझरी या पॉईंटला असतो. पर्यटकांनी थोडा वेळ विश्रांती घ्यावी, निसर्गाचा आनंद लुटावा, पक्षांचा किलबिलाट ऐकावा, निसर्गाकडून भरभरुन समाधान घ्यावे आणि पुढचा प्रवास सुखकारक करावा, या उददेशाने येथे विश्रांतीचा थांबा केला आहे. पुर्वी या ठिकाणी ओबडधोबड दगड आणि सिमेंट बाकांची व्यवस्था होती. मात्र सुनियोजित बैठक व्यवस्था आहे. 

वाघझरी येथे पर्यटकांच्या सोयीसाठी व्यवस्था असताना त्याचा वापर मात्र चुकीच्या गोष्टींसाठी होत आहे. परिसरात ठिकठिकाणी चुली घातल्या आहेत. दररोज येथे साग्रसंगीत रस्सामंडळ सुरु आहे. दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. कोबंड्यांची पंखेही तलावाला जाणाऱ्या रस्त्यातच पडली आहेत. प्लॅस्टिकचा तर खच पडला आहे. तलावाच्या काठावर छोटी विहीर होती. त्याची खोदाई करुन बांधकाम केले आहे. मात्र या विहिरीतही अनावश्‍यक साहित्य टाकले आहे. एक विशिष्ट प्रकारचा दर्प या तलावाभोवती पसरला आहे. 

वाघझरी तळ्याचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. मात्र हुल्लडबाजांमुळे हा परिसर बदनाम होत आहे. येथे दररोजच जेवणावळ्या सुरु आहेत. मद्यप्राशन करुनही सर्व साहित्य तलावाच्या भोवती फेकून दिले जाते. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच पोलीस प्रशासनाने बंदोबस्त, गस्ती पथक ठेवणे आवश्‍यक आहे. 
- विजय बोरगे, जि.प. सदस्य शाहूवाडी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waghzari lake open bar