विरोधी रणनीतीवर वाईकरांची गती

भद्रेश भाटे
शनिवार, 16 मार्च 2019

वाई - वाई-खंडाळा-म’श्‍वर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोणाची उमेदवारी राहणार, याचीच चर्चा गावागावांतील पारांवर रंगत आहे. या ठिकाणी शिवसेनेबरोबरच रिपब्लिकन पक्षाने आपला हक्क सांगितला असला तरी, नेमकी संधी कोणाला मिळणार की काँग्रेसला रामराम ठोकून नुकतेच भाजपवासी झालेल्या मदन भोसले यांना उमेदवारी देऊन भाजप गनिमी कावा साधणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

वाई - वाई-खंडाळा-म’श्‍वर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोणाची उमेदवारी राहणार, याचीच चर्चा गावागावांतील पारांवर रंगत आहे. या ठिकाणी शिवसेनेबरोबरच रिपब्लिकन पक्षाने आपला हक्क सांगितला असला तरी, नेमकी संधी कोणाला मिळणार की काँग्रेसला रामराम ठोकून नुकतेच भाजपवासी झालेल्या मदन भोसले यांना उमेदवारी देऊन भाजप गनिमी कावा साधणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहात असल्याने वाईत नेमकी काय रणनीती राहणार, याबाबतच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. वाई, खंडाळा व महाबळेश्वर या तीन तालुक्‍यांचा समावेश असलेला वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीने लोकसभेसाठी खासदार उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आमदार मकरंद पाटील यांना पक्षाचा आदेश मानून उदयनराजेंचा प्रचार करण्याशिवाय पर्याय नाही. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, निवडून आल्यानंतर खासदारांनी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि आमदारांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारसंघातही उठावदार काम नसल्याने जनमाणसात खासदारांविषयी नाराजी दिसून येते. त्यामुळे उदयराजेंबाबत कार्यकर्ते व जनमाणसात असलेली ही नाराजी दूर करण्याचे आव्हान आमदार पाटील यांच्यापुढे राहणार आहे. 

किसनवीर उद्योग समूहाचे अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले यांनी काँग्रेसला रामराम ठोकून नुकताच आपल्या हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मतदारसंघात काँग्रेस पक्षाची स्थिती दयनीय झाली आहे. पक्षाला सक्षम नेतृत्व राहिले नाही. पर्यायाने आता काँग्रेसची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षातील बुजुर्ग आणि काही निष्ठावंतांनी काँग्रेस विचारांशी फारकत घेऊन तत्त्वनिष्ठेला तिलांजली देण्याच्या मदनदादांच्या निर्णयाला विरोध दर्शविला होता. या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता पक्षातच राहण्याचा निर्धार केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी मदनदादांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. वडील काँग्रेसमध्ये आणि मुलगा भाजपमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे. जुन्या पिढीतील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्यासमवेत काम केले असून त्यांच्याशी जवळीक साधून आघाडीची ताकद वाढविण्यासाठी आमदार पाटील निश्‍चित प्रयत्न करतील. 

मदनदादांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांचे स्पिरीट वाढले असून, तिन्ही तालुक्‍यांत सेना-भाजप युतीची ताकद वाढली आहे. सहकारातील सक्षम नेतृत्व म्हणून भाजप मदन भोसले यांना सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरवून उदयनराजेंविरोधात गनिमी कावा साधणार, की विधानसभेची उमेदवारी देणार, याबाबतची उत्सुकता सर्वसामान्यांमध्ये दिसून येते. 

वाई विधानसभेच्या जागेवर सुरवातीपासून शिवसेनेचा हक्क असल्याने आधी युतीच्या वाटाघाटीत भाजपला ही जागा आपल्या पदरात पाडून घ्यावी लागणार आहे. तसे झाले तर विधानसभा 

आव्हानांची भाऊगर्दी... 
किसन वीर करखान्यावरील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांचा उल्लेख आमचे परममित्र आणि भावी आमदार असा केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, गनिमी काव्याचे राजकारण करीत मदन भोसले यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले गेल्यास, खंडाळ्याचे भूमिपुत्र पुरुषोत्तम जाधव व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरेल. यापूर्वी दोघांनीही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब आजमावून पाहिले आहे. त्यामुळे उदयनराजे आणि पर्यायाने मकरंद पाटील यांच्यापुढे या तिघांचेही आव्हान निर्णायक टप्प्यावरील ठरेल, अशीही चर्चा आहे.

Web Title: Wai Khandala Vidhansabha Election Politics