esakal | या रेल्वेस्थानकात प्रतीक्षा करा एसी कक्षात
sakal

बोलून बातमी शोधा

 Wait in this train station in the AC room

गेल्या वर्षभरात मिरज रेल्वे स्थानकात आता प्रवाशांना स्थानकात गाड्यांची प्रतिक्षा करण्यासाठी प्रतिक्षालय देखील वातानुकूलित करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले.

या रेल्वेस्थानकात प्रतीक्षा करा एसी कक्षात

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज : पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक गाड्या धावणारे रेल्वे स्थानक म्हणून मिरज जंक्‍शन प्रसिध्द आहे. गेल्या वर्षभरात मिरज रेल्वे स्थानकाचा काया पालट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सध्या मिरज स्थाकातील विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. लिफ्ट बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय स्थानकात शुध्द पाण्यासह, सर्वच प्लॅट फॉर्मवर सीसीटीव्ही यंत्रणा, आसन व्यवस्था हे बदल पुणे, मुंबईच्या धर्तीवर करण्यात आले आहेत. 

आता प्रवाशांना स्थानकात गाड्यांची प्रतिक्षा करण्यासाठी प्रतिक्षालय देखील वातानुकूलित करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले. पुरूष, महिला प्रतिक्षालयात दोन वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. त्यासाठी निवादा प्रक्रिया राबवून त्या प्रतिक्षालयाची देखभाल दुरूस्ती खासगी एजन्सींना देण्यात येणार असल्याचे सांगणयात आले. 

वातानुकूलित प्रतिक्षालयाला शुल्क आकारणी केली जाऊ शकते. मात्र प्रवाशांना गाडी येईपर्यंत उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका करून घेण्यासाठी ही वातानुकूलित यंत्रणा मदत करणार आहे. शिवाय स्थानकामध्ये कोठेही थांबून गाड्यांची माहिती तत्काळ प्रवाशांना समजण्यासाठी तिकीट विभाग, आरक्षण विभाग, प्रतिक्षालय, प्लॅट फॉर्म, जिने, लिफ्ट या ठिकाणी तीसहून अधिक स्मार्ट एलईडी डिजीटल फलक बसवण्यात येणार आहेत. या फलकाद्वारे कोणती गाडी कोणत्या प्लॅट फॉर्मवर उभी आहे. ती कोणत्या वेळेत धावणार आहे. ती स्थानकात किती वाजून किती मिनीटांनी येईल आणि कधी सुटेल, विलंब झालेल्या गाड्यांची नावे, त्यांचा विलंब झालेली वेळ यासह सर्वच गोष्टी या डिजीटल स्मार्ट एलईटी फलकाद्वारे प्रवाशांना तत्काळ कळणार आहेत. 

"युटीएस' ऍपमुळे प्रवाशांना फायदा 

प्रवाशांना साधे जनरल तिकीट काढण्यासाठी रेल्वेने सुरू केलेल्या युटीएस ऍपमुळे प्रवाशांचा फायदा होत आहे. यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याचा त्रास वाचणार आहे. 

रेल्वेची रनिंग स्थिती ऍपवर 
रेल्वे कोणत्या स्थानकातून सुटणार आहे. आणि किती वाजता येणार आहे. हे दर्शविणारे रेल्वेचे ऍप काही वेळा चुकीची माहिती देत असतात. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते. नेमकी माहिती दर्शविणारे ऍप चुकीची माहिती देत आहेत. का याची खात्री करूनच प्रवाशांनी संबंधित ऍप डाऊन लोड करावे.

loading image