वालचंदनगरमध्ये मनसेच्या वतीने पाणपोई सुरु

राजकुमार थोरात
बुधवार, 9 मे 2018

उन्हाळ्यामध्ये ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नये यामुळे मनसेच्या वतीने पाणपोई सुरु केली आहे.

वालचंदनगर (ता.इंदापूर) - येथिल बाजारपेठमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरिकांसाठी मोफत पाणपोई सुरु केली आहे. बाजारपेठमध्ये इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील रणगाव, कळंब, निमसाखर, चिखली, जंक्शन, लालपुरी परीसरातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. तसेच स्थानिकांची ही नेहमी गर्दी असते.

उन्हाळ्यामध्ये ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नये यामुळे मनसेच्या वतीने पाणपोई सुरु केली आहे. पाणपोईचे उद्घाटन सरकारी वकील अॅड. पांडुरंग गायकवाड पाटील, महावितरणचे अभियंता अशोक खामगळ, विकास दोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

मनसे तालुकाध्यक्ष संतोष भिसे, उपाध्यक्ष प्रदीप रकटे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण, शैलेश पाटील, गौरव थोरात, विशाल चव्हाण, जुबेर मुलाणी, वैभव चव्हाण यावेळी उपस्थित होते.

Web Title: In walchandnagar panpoi was started