गुंड यांचे उलटे चालण्याचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मराठा आरक्षणासाठी पुणे ते तुळजापूरदरम्यान प्रवास; लोणंदमध्ये स्वागत

लोणंद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी फुरसुंगी (पुणे) येथील बापूराव ऊर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी पुणे ते तुळजापूर असा पायी उलटे चालत जाण्याचे आंदोलन सुरू केले आहे. येथील मराठा समाजाच्या वतीने नुकतेच त्यांचे स्वागत करण्यात आले. 

मूकमोर्चा व शांततेच्या मार्गाने उलटे चालत जावून पायी वारी करण्याचा संकल्प श्री. गुंड यांनी सोडला आहे. सहा जानेवारीला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती व तांबडी जोगेश्वरी मातेचा आशीर्वाद घेऊन या उलट्या प्रवासाला त्यांनी प्रारंभ केला आहे. सकाळी साडेसहा वाजता राष्ट्रगीत म्हणून प्रवासाला सुरवात करून सायंकाळी ज्या ठिकाणी सहा वाजतील तेथे ते मुक्काम करत आहेत. पुणे, हडपसर, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर असा प्रवासाचा मार्ग आहे. मराठा आरक्षणासह महिलांवरील अत्याचार थांबवावेत, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

श्री. गुंड यांचे येथे आगमन होताच मराठा समाज मंडळाच्या वतीने अध्यक्ष अमोल चंद, उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, अविनाश नलवडे, सचिव अतुल भोसले, खजिनदार विजय कुतवळ यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

Web Title: Walking downward movement by gund