काँग्रेस - भाजपमध्ये सांगलीत ‘वॉल- वॉर’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सांगली - आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आता राजकीय कुरघोड्यांनी वातावरण रंगू लागले आहे. जिल्ह्यात भाजपने काही ठिकाणी भिंतीवर ‘कमळ’ चिन्ह रंगवण्याचा फंडा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने सांगली शहरात दोन ठिकाणी भिंतीवर ‘देशका चौकीदार चोर है’ असा मजकूर रंगवला. 

सांगली - आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आता राजकीय कुरघोड्यांनी वातावरण रंगू लागले आहे. जिल्ह्यात भाजपने काही ठिकाणी भिंतीवर ‘कमळ’ चिन्ह रंगवण्याचा फंडा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने सांगली शहरात दोन ठिकाणी भिंतीवर ‘देशका चौकीदार चोर है’ असा मजकूर रंगवला. 

दोन पक्षांतील या ‘वॉल-वॉर’ने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन हा मजकूर पांढऱ्या रंगाने रंगवून पुसून टाकला. भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल  मीडियावरून त्याचा निषेध केला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने ‘पहले चिन्ह..बादमें चेहरा’ अशी क्‍लृप्ती लढवत ग्रामीण भागातील अनेक भिंतीवर पक्षाचे ‘कमळ’ चिन्ह झळकवलेय. भाजपच्या या फंड्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. विशेषत: इस्लामपूर विधानसभा मतदार संघात फंडा वापरला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. येडेमच्छिंद्र येथे तर डांबर फासण्याचा प्रकारही घडला आहे.

भाजपने चिन्हाने भिंती रंगवण्याचा फंडा काढल्यामुळे काँग्रेसने त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी केली. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारच्या सुमारास काँग्रेस भवन आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या भिंतीवर ‘देशका चौकीदार चोर है’ असा मजकूर रंगवला. त्यामुळे परिसरातून ये-जा  करणाऱ्यांसाठी हा कुतूहल व चर्चेचा विषय ठरला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले. पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच या मजकुरावर तातडीने पांढरा रंग  फासून तो पुसून टाकला. 

तिघे ताब्यात
काँग्रेस भवनजवळ आणि सिव्हिल हॉस्पिटलजवळ वादग्रस्त मजकूर रंगवल्याबद्दल पोलिसांनी नगरसेवक मंगेश चव्हाण, योगेश राणे, ओंकार पाटील या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत भाजपकडून कोणीही तक्रार दिली नव्हती. गुन्हा दाखल करण्याबाबत उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.

भाजपकडून निषेध म्हणून मजकूर
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले,‘‘देशातील बॅंका बुडवणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यासारख्या चोरांना पळून जाण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. चोरांना सहकार्य करणाऱ्यांचा निषेध म्हणून आम्ही मजकूर रंगवला आहे.’’
 

Web Title: wall war in between Congress - BJP in Sangli