प्रीतिसंगमस्थळी होणार संरक्षक भिंत 

प्रीतिसंगमस्थळी होणार संरक्षक भिंत 

कऱ्हाड - आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीभोवती संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३९ कोटी ६० लाख ५८ हजारांचा निधी द्यावा, असा प्रस्ताव सांगली पाटबंधारे मंडळ व टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाने दिला आहे. भिंतीपासून उजव्या काठावर पूर संरक्षक भिंतीसाठी मागील प्रस्तावापेक्षाही सुमारे २५ कोटींचा अधिक निधी प्रस्तावित केला आहे. त्या भिंतीची उंची साडेसहा फूट आहे. त्यामुळे समाधी स्मारकासह त्यालगतच्या सुमारे दोन हजार ५६२ मीटरपर्यंतच्या नागरी वस्तीचे संरक्षण होणार आहे. लवकरच त्या भिंतीचे काम सुरू होण्याची शक्‍यता आहे.  

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी १९९० मध्ये स्मारक बांधले. ते स्मारक नदी काठावर आहे. मात्र काळ जाईल तसे त्या स्मारकाभोवती भोवती अनेक अडचणी येत आहेत. स्मारक परिसरात २००१ पासून जमीन खचण्याची भीती उद्‌भवू लागली. कोयना व कृष्णा नदीस येणाऱ्या पुरामुळे स्मारकाच्या बाजूच्या जमिनींची धूप होऊ लागली. २००५ व २००६ मध्ये सलग दोन वर्षे आलेल्या पुराचा वेढा समाधी स्मारकास बसला. त्यामुळे त्या भागातील काही जमीनही ढासळली.  त्‍यानंतर जलसंपदा विभागाने प्रस्तावित एक हजार ६०० मीटर लांबीच्या कामापैकी एक हजार १६८ मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले. त्‍यानंतर नव्याने कृष्णा पुलापर्यंतच्या संरक्षण भिंतीचा विचार पुढे आला. त्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार दोन हजार ५६२ मीटर लांबीच्या संरक्षित भिंतींचा प्रस्तावाची चर्चा सुरू झाली. सध्या सुधारित प्रस्तावानुसार प्रीतिसंगमावरील ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधी स्मारकाभोवती संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्याचा सुमारे ३९ कोटींचा प्रस्तावही देण्यात आला आहे. 

अशी असेल संरक्षक भिंत
समाधिस्थळापासून वरील बाजूस १५५६ तर खालील बाजूस एक हजार मीटरची होणार भिंत 
संरक्षक भिंतीची तळातील रुंदी साडेचार मीटर, तर वरील रुंदी दीड मीटरची असेल.  
भिंतीत सुमारे बारा ते २० मीटर रुंदीचे दगडी पिंचिंग असेल. 
पिंचिंगची खोली अर्धाफूट खोल असेल. 
संरक्षक भिंत गॅब्रियन जाळ्यात कोरड्या दगडाच्या बांधकामात असेल. 
संरक्षक भिंतीवर पाय पुलाची व्यवस्था असेल. 
नागरी वस्तीच्या संरक्षणासह जमिनीची धूपही रोखता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com