वाळवा भाजप तालुकाध्यक्ष म्हणाले, यासाठीच सदाभाऊंना मंत्रीपद दिले काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील भाजप संपवण्यासाठी सेटलमेंट केली असा आरोप करत यासाठीच तुम्हाला भाजपने मंत्रीपद दिले काय? असा सवाल भाजपचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केला. यावेळी सदाभाऊ खोत यांच्यावर त्यांनी जोरदार आगपाखड केली.

भाजपचे बंडखोर उमेदवार निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या विराट सभेत ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, “ ज्यावेळी आम्ही वाळवा तालुक्यातील भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी सहा ते सात कार्यकर्ते तालुक्यात कार्यरत होते. गावोगाव भाजपचे संघटन केेले. त्याची प्रचिती आजच्या सभेवरुन सर्वांना आले असेल, मात्र तालुक्यात भाजप वाढू नये यासाठी सदाभाऊ खोत सक्रीय झाले. याचे खूप वाईट वाटते. त्यांनी सेटलमेंट केली.

सदाभाऊ, तुम्ही कितीही सेटलमेंट करा. या तालुक्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. आपली ओळखच सेटलमेंट बहाद्दर झाली आहे, याचे भान असू द्या, अशी टीकाही श्री. पाटील यांनी केली. आम्ही आता स्वबळावर भाजपवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत व विशिष्ट हेतूने एकत्र आलेल्यांना जागा दाखवू, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Walwa Taluka BJP president Prasad Patil comment