वाळवा तालुक्यात चोविस तासात सर्वाधिक 32.5 मि. मी. पाऊस

Rains in Walwa Taluka
Rains in Walwa Taluka

सांगली - जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. ढगांच्या गडगाटासह काल संध्याकाळपासून पावसाने जोर धरला असून आज सकाळी दहा वाजेपर्यंत सरासरी 15.40 मि. मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक 32.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

काल संध्याकाळी पावसाने झोडपायला सुरवात केली. रात्री मुसळधार पाऊस कोसळला. यात उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऊसाच्या शेतात पाणी साचले आहे. तर सोयाबिन व काढणीस आलेली पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी अशी (कंसात एका जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये) 

मिरज  21.7 (735.2), जत 0.4 (406.3), खानापूर - विटा 6.8 (652.6), वाळवा - इस्लामपूर 32.5 (895.4), तासगाव  13.2 (619.3), शिराळा  12.8 (2004.4), आटपाडी  10.7 (524.5), कवठेमहांकाळ 8.5 (566.7), पलूस 22.5 (623.3) व कडेगाव 11.4 (973.4).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com