स्मार्ट सिटी'त प्राण्यांना हवा सुरक्षित आश्रय

Want to animals Safe in the smart city
Want to animals Safe in the smart city

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्राण्यांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कारवाई व्हायला हवी. गायी, गाढवे आणि कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने आश्रयस्थान उपलब्ध करून द्यायला हवे. प्राण्यांच्या रेस्क्‍यूसाठी स्वतंत्र पथकही स्थापन करायला हवे अशा सूचना सोलापुरातील प्राणीमित्रांनी मांडल्या.

जागतिक प्राणी दिनाच्या निमित्ताने सकाळ कार्यालयात प्राणीमित्रांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्राणी सुरक्षेबाबत चर्चा झाली. 

प्राण्यांच्या सुरक्षेसाठी सर्व सोलापूरकरांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. "सकाळ' नेहमीच जनजागृतीसाठी पाठबळ देत असतो. आम्ही जखमी गाढवांवर उपचार करतो, मात्र त्यांना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. स्मार्ट सिटी करताना महानगरपालिकेने जखमी गाढवांसह इतरही प्राण्यांचा विचार करावा. - सुचित्रा गडद, प्राणीमित्र 

"राहत ऍनिमल' संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपचार करण्यासाठी काम करतो. कचरा कुंडीमध्ये अन्न टाकले जात असल्याने कुत्र्यांची संख्या सोलापुरात वाढतच आहे. नसबंदीची प्रक्रिया अधिक गतीने राबविणे गरजेचे आहे. यासंदर्भात नागरिकांमध्येही प्रबोधन आवश्‍यक आहे. - डॉ. राकेश चितोडा, सदस्य, ऍनिमल राहत संस्था 

प्राण्यांना दुखापत पोहोचल्यानंतर काय शिक्षा होऊ शकते या संदर्भात प्रबोधनाची गरज आहे. सोलापुरात प्राण्यांना आश्रय मिळण्यासाठी शेल्टर हाऊसची आवश्‍यकता आहे, यासाठी महापालिका आणि शासनाने निधी उपलब्ध करून द्यायला हवा. जखमी प्राण्यांवर उपचारासाठी स्वतंत्र पथक हवे. - ऍड. स्वप्नाली चालुक्‍य, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल 

महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील प्राणी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही दक्षता घेतली आहे. शहरातील जनावरांचा कोंडवाडा लोकवस्तीपासून पुणे रस्त्यावर नेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. प्राणीमित्रांची आयुक्तांसोबत बैठक घेऊन स्मार्ट सिटीतील प्राण्यांच्या सुरक्षेवर उपाय करता येतील. - डॉ. शुभांगी ताजणे, पशुवैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका 

शहरातील बागांमध्ये प्राण्यांसाठी आश्रयस्थान उभारता येऊ शकतो. प्राणीमित्रांच्या मदतीने देखभाल होईल. महापालिकेने मोकाट जनावरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. जे लोक आपली जनावरे रस्त्यावर सोडतात त्यांच्यावर कारवाई करावी. पक्ष्यांसाठीही महापालिकेने "रेस्क्‍यू पथक' स्थापन करावे. - मनीष जाधवानी, ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर

जनावरांचे कोंडवाडे लोकवस्तीपासून दूर न्यावेत. भटकणाऱ्या प्राण्यांकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटी कशी होईल? मोकाट जनावरे पकडण्यासाठी जादा वाहनाची आवश्‍यकता आहे. महापालिकेने प्राणीमित्रांच्या समितीद्वारे उपाय करावेत, कत्तलखान्यांवर कारवाई व्हावी. - केतन शहा, ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com