#KolhapurFlood कोल्हापुरातून मुंबई, पुणे येथे यायचे-जायचे आहे, मग असे या - जा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात येत आहे. बरेचसे मार्ग खुले झाले आहेत. पण अद्यापही पुणे - बंगळूर महामार्गावर पाणी असल्याने हा मार्ग अद्यापही बंद आहे. जिल्ह्यातील इतर मार्गावर काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्यांना फोडा घाटातून कोकणात उतरून जाणे शक्य आहे. अद्याप पंचगंगा नदीवरील पाणी पातळी 49 फुट 10 इंच इतकी आहे. त्यामुळे पुणे बंगळूर महामार्ग उद्यापर्यंत तरी सुरू होणे शक्य नाही.

पुणे - मुंबईला असे जा...

कोल्हापूरहुन मुंबई- पुण्याकडे जाणेसाठी पर्यायी मार्ग संभाजीनगर - कळंबा -मुधाळ तिठ्ठा - राधानगरी - दाजीपूर - फोंडा मार्गे  - कोकणात जाता येते. कोकणात मुंबई - गोवा मार्गावर वाहतूक सुरू आहे. तसेच चिपळुणवरून कराडमार्गे पुणे असा पर्यायी मार्गही सुरू आहे. पुणे - मुंबईसाठी असे जाता येणे शक्य आहे. 

दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील पूर ओसरत आहे. निपाणीजवळ यमगर्णी येथे राष्ट्रीय महामार्गावर आलेले पाणी ओसरत आहे. या मार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. पण कागलजवळ दुधगंगा नदीवर अद्याप तीन फुट पाणी असल्याने महाराष्ट्राकडे येणारी वाहतूक अद्याप बंद आहे. 

जिल्ह्या अंतर्गत रस्त्यामध्ये भुदरगड तालुक्यातील सर्व रस्ते सुरू झाले आहेत. अद्यापही जिल्ह्यातील 101 बंधाऱ्यावर पाणी आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Want to go from Kolhapur to Mumbai, Pune, then go this way